निवडा आपल्या करिअरची दिशा | पुढारी

निवडा आपल्या करिअरची दिशा

कोल्हापूर : दै. ‘पुढारी’ एज्युदिशाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना करिअर संधीचे नवे दालन खुले होणार आहे. शनिवार, दि. 28 ते 30 मे दरम्यान, हे प्रदर्शन डॉ. व्ही. टी. पाटील मेमोरिअल हॉल, राजारामपुरी येथे आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात शैक्षणिक क्षेत्रातील करिअरच्या द़ृष्टीने बहुविध माहिती, तज्ज्ञांचे मार्गदर्शन विद्यार्थी व पालकांना मिळणार आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटांवरील नवीन खजिना उपलब्ध होणार आहे. कोल्हापूरसह सातारा येथे अलंकार हॉल, पोलिस करमणूक केंद्र येथे दि. 3 ते 5 जून आणि सांगलीमध्ये जैन कच्छी भवन येथे दि. 10 ते 12 जून दरम्यान हे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे.

संजय घोडावत युनिव्हर्सिटी प्रस्तुत पुढारी एज्युदिशा 2022 कार्यक्रमासाठी सहयोगी प्रायोजक एम.आय.टी. एडीटी युनिव्हर्सिटी पुणे, प्रा. मोटेगावकर सरांची रेणुकाई करिअर सेंटर लातूर, आरसीसी, आयआयबी क्लासेस लातूर, सहप्रायोजक अजिंक्य डी. वाय.पाटील युनिव्हर्सिटी, सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, पुणे यांचे सहकार्य लाभले आहे.

शिक्षणाबरोबरच करिअरच्या असंख्य संधी उपलब्ध करून देणार्‍या दै. ‘पुढारी’ एज्युदिशा प्रदर्शनाची विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये कायम उत्सुकता असते. दहावी-बारावीच्या परीक्षांचा महत्त्वपूर्ण टप्पा पार केल्यानंतर पुढे नेमकं करायचे तरी काय, असा प्रश्न विद्यार्थी – पालकांसमोर पडतो. अशावेळी भविष्याचा अचूक वेध घेत करिअर निवडताना हे शैक्षणिक प्रदर्शन एज्युदिशा महत्त्वपूर्ण ठरते आहे.

प्रदर्शनात नामवंत शिक्षण संस्थांचा समावेश असून, करिअरविषयक तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. याशिवाय आपल्या शिक्षण आणि गुणवत्तेनुसार करिअरच्या अगणित संधी एकाच ठिकाणी उपलब्ध होणारी संधी दै. ‘पुढारी’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. प्रदर्शनात नामांकित, मान्यताप्राप्त विद्यापीठे, महाविद्यालये व कोचिंग क्लासेस स्टॉल्स यांचा समावेश असणार आहे. अ‍ॅग्रीकल्चर, हॉटेल मॅनेजमेंट, अ‍ॅनिमेशन, बायो टेक्नॉलॉजी, फायर इंजिनिअरिंग, नॅनो टेक्नॉलॉजी, स्पर्धा परीक्षा, डिस्टन्स लर्निंग आदीबाबतच्या माहितीचा खजिना मिळणार आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क : सनी – 9922930180,
प्रणव – 9404077990,
परितोष – 9766213003.

Back to top button