नाशिक : कंपनीचे कथित अतिक्रमण; वृद्ध महिलेची तक्रार

संग्रहित छायाचित्र.
संग्रहित छायाचित्र.
Published on
Updated on

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

सारूळ शिवारात असलेल्या एका वृद्ध महिलेच्या जागेवर कंपनी मालकाने गेल्या अनेक वर्षांपासून भिंत बांधून बळजबरीने जागेचा ताबा घेतल्याविरोधात संबंधितांनी वाडीवऱ्हे पोलिस ठाण्यात कथित अतिक्रमण हटवण्याबाबत व पोलिस संरक्षण मिळण्याबाबत तक्रार अर्ज दाखल केला आहे. या संदर्भात पोलिस प्रशासन आता काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जागेच्या मालक रंजनाबाई देवराम चौधरी यांच्या मालकीची साडे सात गुंठे जमीन आहे. या जमिनीवर पिफनर इन्स्ट्रूमेंट ट्रान्स्फॉर्मन्स प्रा. लि. कंपनीने अतिक्रमण केल्याची तक्रार चौधरी यांनी केली आहे. अतिक्रमण हटवण्याबाबत त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर चौधरी याने कंपनीचे सीईओ पी. रवि पिचा व व्यवस्थापक जनार्दन कारभारी शिंदे यांच्यासोबत चर्चा केली. परंतु त्यांनी शिवीगाळ करत धमक्या दिल्या. त्याच्या धमक्यांमुळे आपले कुटुंब पूर्णपणे घाबरले असून, घराबाहेर निघणेही आम्हाला कठीण झाले आहे. या जमिनीवर आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. या जमिनीची सरकारी मोजणी केलेली असून, मोजणीचा नकाशा या अर्जासोबत जोडलेला आहे, असे त्यांनी पोलिस तक्रारीत म्हटले आहे. त्यांनी तक्रार अर्ज पोलिस अधीक्षक, पोलिस उपअधीक्षक व वाडीवऱ्हे पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांना दिला आहे.

आमच्या मालकीच्या जमिनीवर कंपनीने अनधिकृत संरक्षक भिंत बांधली आहे. यासंदर्भात भूमिअभिलेख कार्यालयाकडून जमिनीची रीतसर मोजणी केली असून, त्याची कागदपत्रे आहेत. वाडीवऱ्हे पोलिस ठाण्यात अतिक्रमण हटविण्यासंदर्भात तक्रार केली आहे. कंपनी व्यवस्थापन धमकविण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे आम्हाला पोलिस संरक्षणाची गरज आहे.

– ज्ञानेश्वर चौधरी, जमीनमालक, सारुळ

या जागेची रीतसर मोजणी करावी याकरिता आम्ही भूमिअभिलेख कार्यालयात २ फेब्रुवारी २०२३ रोजी अर्ज केला आहे. त्याची मोजणी जूनमध्ये होणार आहे. त्यानंतर योग्य तो निर्णय होईल. मुरमाची रॉयल्टी भरली आहे किंवा नाही याची कल्पना नाही. एक एकर एनए असलेल्या पडीक जमिनीवर वृक्ष लावण्यात आलेले आहे.

– जनार्दन कारभारी शिंदे, व्यवस्थापक, पिफनर इनस्ट्रूमेंट्स ट्रान्स्फॉर्मन्स प्रा. लि. कंपनी, सारुळ

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news