नाशिक : धारदार शस्त्राने गळ्यावर वार ; तरुणाचा मृत्यू

नाशिक : धारदार शस्त्राने गळ्यावर वार ; तरुणाचा मृत्यू
Published on
Updated on

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा
शहरातील रेल्वे तलाव येथे अंघोळीसाठी गेलेल्या विशाल चंद्रकांत ठवळे (36, रा. डाकबंगला, इगतपुरी) या विवाहित तरुणावर रविवारी (दि. 22) दुपारी तीनच्या सुमारास अज्ञातांनी धारदार शस्त्राने गळ्यावर वार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. संशयित फरार झाले असून, इगतपुरी पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

विशाल ठवळे हा 13 वर्षांचा भाचा व 8 वर्षांचा मुलगा यांना सोबत घेऊन, घरापासून जवळच असलेल्या रेल्वे तलावात अंघोळीसाठी गेला होता. तलावाच्या पाण्यात अगोदरच दोन अज्ञात तरुणी व दोन तरुण अंघोळ करीत होते. याच ठिकाणी बाजूला विशाल ठवळे अंघोळ करून कपडे बदलण्यासाठी आला. तेव्हा बाजूच्या कपड्यावर पाणी उडाल्याची कुरापत काढून संबंधित तरुणी व तरुणांनी वाद निर्माण करीत धारदार शस्त्राचा धाक दाखवून विशालला मुलींची माफी मागण्यास सांगून पाया पडण्यास व नाक घासण्यास लावले. त्यानंतर वाद मिटला असे भासवून अज्ञात तरुणी व तरुण मद्य पिण्यासाठी तलावाच्या बाजूला बसले. यावेळी त्यातील एका तरुणाने मागून पळत जात कुठल्यातरी धारदार शस्त्राने विशालच्या मानेची नस कापली. विशालने जोराची किंकाळी मारल्याने अज्ञात पसार झाले, अशी माहिती मृत विशालचा भाचा व मुलाने जबाबात दिली असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

घटनेची माहिती मिळताच, पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले व रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या विशालला ग्रामीण रुग्णालयात आणले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करीत श्वानपथकाला पाचारण केले. पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक वसंत पथवे, पोलिस उपनिरीक्षक राजाराम दिवटे, सहायक पोलिस निरीक्षक रमेश शेंडे, एएसआय रामदास जाधव, पोलिस कर्मचारी मुकेश महिरे, साळवे, सचिन मुकणे, सचिन बेंडकुळे, आबासाहेब भगरे पुढील तपास करीत आहेत.

ग्रामीण रुग्णालयाचा भोंगळ कारभार
दुपारी 3 वाजेपासून रुग्णवाहिकेसाठी फोन करुनही रूग्णवाहिका तब्बल तीन तासांनी घटनास्थळी पोहचली. पोलीसांनी मयत विशाल ठवळेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टर उपलब्ध नसल्याने तब्बल 20 तासांनी मयत ठवळेचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिल्याने नातेवाईक व नागरिकांनी रोष व्यक्त केला.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news