नाशिक : आदिवासी कुटुंबातील मुलगा बनला पायलट

कनाशी : गिरीश महाले यांचे आदिवासी समाजाकडून स्वागत करतांना निवृत्ती बागुल, यशवंत गावीत ,अनिल पवार, केशव बहिरम आदी.  (छाया: शेखर महाले)
कनाशी : गिरीश महाले यांचे आदिवासी समाजाकडून स्वागत करतांना निवृत्ती बागुल, यशवंत गावीत ,अनिल पवार, केशव बहिरम आदी.  (छाया: शेखर महाले)

नाशिक (कनाशी) : पुढारी वृत्तसेवा

कळवण तालुक्यातील कनाशी येथील आदिवासी कुटुंबातील मुलगा आकाशाला गवसणी घालत पायलट बनल्याने त्याच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

मुरलीधर दोधा महाले (रा. सध्या मखमलाबाद शांतीनगर, नाशिक) हे सहकार खात्यात लेखापरीक्षक पदावर कार्यरत असून त्यांच्या मुलाने गिरिश याने मेहनतीच्या बळावर पायलट होऊन नवे आकाश गाठले आहे. गिरिशने नाशिक येथील महाविद्यालयामधून १२ वी सायन्स प्रवाहातून शिक्षण घेऊन कमर्शियल पायलट होण्याचे ठरवले. शिक्षकांचे मार्गदर्शन तसेच प्रखर बुद्धिमत्ता आणि सर्वांच्या प्रोत्साहनातून देशात एकमेव असलेल्या शासकिय इंदिरा गांधी राष्ट्रीय उडाण ॲकेडमी रायबरेली उतरप्रदेश या संस्थेत परिक्षा व मुलाखतीतून पहिल्याच प्रयत्नात यश संपादन करून प्रवेश मिळवला. विमान उड्डाणाचे प्रशिक्षण उत्तमरितीने पार पाडले. प्रथमश्रेणीचे गुण संपादित करून शिक्षण पूर्ण केले. गिरिशच्या बॅचमध्ये बेस्ट ट्रेनी पायलट म्हणून प्रथम क्रमांकावर निवड करण्यात आली आहे. तसेच टाटा मेमोरियल ट्रस्ट मुंबई यांच्याकडून पंचतारांकित हॉटेलमध्ये गरीषला सन्मानित करण्यात आले. हा सन्मान आदिवासी कोकणा समाजाच्या मुलाला पहिल्यांदा प्राप्त झाल्याचे त्याने नमूद केले. तसेच गिरिशची इंडिगो एअरलाईन्समध्ये देखील निवड झाली आहे. इंडिगोच्या वतीने गिरिशने विशेष विमान उड्डाणाचे प्रशिक्षण सिंगापूर येथे पूर्ण केले. गिरिशच्या या यशस्वी प्रवासाकरिता तसेच झालेल्या निवडीकरिता कळवण शासकीय आश्रमशाळा गोपाळखडी येथे गिरीश महाले यांचे जंगी स्वागत करण्यात आले व तालुक्यातील आदिवासी बांधवांनी गरीशच्या यशाचे कौतुक केले. यावेळी आदिवासी बचाव अभियानाचे कार्याध्यक्ष के. के. गांगुर्डे, राम चौरे, निवृत्ती बागुल, यशवंत गावित, केशव बहीरम, राहुल बागुल, अनिल पवार , पोपट वाघ, रामचंद्र पवार व मित्रपरिवार, नातेवाईक व शासकीय माध्यमिक आश्रम शाळा गोपाळखडी मुख्याध्यापक कर्मचारीवृंद उपस्थित होते.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news