

पुढारी ऑनलाइन डेस्क : भारतीय क्रिकेट बोर्डाकडून (बीसीसीआय) इंडियन प्रीमियर लीग (TATA IPL 2023) 2023 च्या हंगामासाठी कोची येथे 2 डिसेंबर रोजी लिलाव होणार आहे. 714 भारतीय आणि 277 परदेशी खेळाडूंसह तब्बल 991 खेळाडूंची लिलावासाठी नोंदणी झाली आहे.
दरम्यान, 991 नोंदणीकृत खेळाडूंच्या यादीत ऑस्ट्रेलियाचे अधिक खेळाडू आहेत. लिलावासाठी नोंदणी केलेल्या सर्वाधिक खेळाडूंमध्ये दक्षिण आफ्रिका (52), वेस्ट इंडीज(33) आणि इंग्लंड (31) च्या खेळाडूंच्या खेळाडूंचा समावेश आहे. भारतातील 19 कॅप्ड खेळाडूंनी लिलावासाठी नोंदणी केली आहे. बीसीसीआयने खेळाडूंची नावे जाहीर केलेली नाहीत. पण लिलावाच्या अगोदरच 991 नावे जाहीर करण्यात येणार आहेत, असे बीसीसीआयने सांगितले. (TATA IPL 2023)
सर्व १० फ्रँचायझींनी १५ नोव्हेंबर २०२२ रोजी त्यांच्या कायम ठेवलेल्या आणि सोडलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. एकूण १६३ खेळाडूंना कायम ठेवण्यात आले होते आणि इतर ८५ खेळाडूंना त्यांच्या संघांनी सोडले होते. आयपीएल लिलावासाठी नोंदणी ३० नोव्हेंबर २०२२ रोजी संपली. एकूण ९९१ खेळाडूंनी लिलावात प्रवेश केला आहे. २३ डिसेंबर २०२२ रोजी कोची येथे लिलाव सुरू होईल.
आगामी लिलावाच्या स्वरूपानुसार खेळाडूंचे चार बँड असतील. त्याचे २ कोटी बँड, १.५ कोटी बँड, १ कोटी बँड आणि ५० लाख बँड असे वर्गीकरण केले आहे. विशेष म्हणजे भारतीय वंशाच्या खेळाडूंना मोठा धक्का बसला आहे.
खेळाडूंची नोंदणी