नाशिक : ट्रॉली उलटून ३० क्विंटल कांदा खड्ड्यात

लासलगाव : खड्ड्यांमुळे ट्रॉली उलटली आणि 30 क्विंटल कांदा पाण्यात भिजल्यानंतर तो काढण्यासाठी सुरू असलेली मजुरांची धावपळ. (छाया: राकेश बोरा)
लासलगाव : खड्ड्यांमुळे ट्रॉली उलटली आणि 30 क्विंटल कांदा पाण्यात भिजल्यानंतर तो काढण्यासाठी सुरू असलेली मजुरांची धावपळ. (छाया: राकेश बोरा)
Published on
Updated on

नाशिक (लासलगाव): पुढारी वृत्तसेवा

लासलगावजवळील पिंपळगावहून बाजार समितीत ट्रॅक्टरमधून कांदा विक्रीसाठी घेऊन येत असताना रस्त्याच्या खराब साइडपट्ट्यांमुळे ट्रॅक्टरची ट्रॉली उलटल्याने तब्बल 30 क्विंटल कांदा रस्त्याच्या कडेला असलेल्या डबक्यामध्ये भिजल्याने शेतकऱ्याचे नुकसान झाले. ठेकेदाराच्या हलगर्जीपणाने शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले आहे.

लासलगाव-कोटमगाव रस्त्याच्या साइडपट्टया व्यवस्थित भरलेल्या नाही. शेतकरी संतोष घोडे हे आपला ३० क्विंटल कांदा घेऊन येत होते. बाजार समितीपासून हाकेच्या अंतरावर त्यांच्या ट्रॅक्टरचे चाक वरखाली झालेल्या साइडपट्ट्यांमुळे खाली घसरले आणि कांद्याने भरलेली ट्रॉली उलटली. यात घोडे यांना कुठलीही दुखापत झाली नाही. पण, ट्रॉली उलटल्याने 30 क्विंटल कांदा हा रस्त्याच्या कडेला पावसाच्या पाण्यात भिजल्यामुळे नुकसान झाले आहे कांद्याने भरलेली ट्रॉली उलटल्याची माहिती शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रकाश पाटील, राजेंद्र कराड आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचे सरचिटणीस बबन शिंदे यांनी लासलगाव बाजार समितीच्या प्रशासनाला देताच त्यांनी बाजार समितीतील हमाल आणि कर्मचारी तातडीने पाठविले. जेसीबीच्या साह्याने उलटलेली ट्रॉली सरळ करत त्या ठिकाणचा सर्व कांदा उचलण्यासाठी मदत केली. मात्र, नुकसान झालेल्या कांद्याची सार्वजनिक बांधकाम विभागाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी संतोष घोडे यांनी केली आहे

बाजार समितीवरही जबाबदारी

लासलगाव बाजार समितीसमोर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यावरून ट्रॉली उलटल्याने नुकसान झालेल्या कांद्याची भरपाई बाजार समितीने द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे 42 गाव तालुकाप्रमुख प्रकाश पाटील, राजेंद्र कराड आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचे सरचिटणीस बबन शिंदे यांनी बाजार समितीकडे केली.

आमच्याकडे भरपाई मागणे अयोग्य

रस्त्यावरून ट्रॅक्टरची ट्रॉली उलटल्याने बाजार समितीकडून नुकसानभरपाई मागणे अयोग्य असून, बाजार समितीच्या स्वखर्चातून जेसीबीच्या सहाय्याने उलटलेली ट्रॅक्टरची ट्रॉली सरळ करण्यात आली. पाण्यात भिजलेला कांदा हा संपूर्ण उचलून देत सुरक्षित ठिकाणी वाळवण्यासाठी जाग उपलब्ध करत मदत केल्याचे लासलगाव बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांनी सांगितले.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news