नाशिक : जिल्ह्यात नव्याने 16 कोरोनाबाधित

नाशिक : जिल्ह्यात नव्याने 16 कोरोनाबाधित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात शनिवारी (दि.8) नव्याने 16 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यात शहरात सात, ग्रामीण भागात पाच, मालेगावमध्ये एक व परजिल्ह्यात तीन बाधितांचा समावेश आहे. शनिवारी दिवसभरात तीन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात शनिवारी सायंकाळपर्यंत 86 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू होते. त्यापैकी दोघांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली आहेत. जिल्ह्यातील 15 संशयितांचा अहवाल प्रलंबित आहे. देशभरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने सावधानतेचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news