Crime News
Crime NewsPudhari file photo

Nandurbar Crime | सोशल मीडियावरील ओळख भोवली: दहापट रकमेच्या आमिषाने प्राणघातक हल्ला; चौघे जखमी, ६ जणांना अटक

संबंधित व्यक्तीने १० हजार रुपयांच्या बदल्यात १ लाख रुपये देण्याचे आमिष दाखवले
Published on

Social Media Fraud Nandurbar

नंदुरबार : सोशल मीडियावर ओळख वाढवत तरुणांना जाळ्यात ओढून दहापट रक्कम देण्याचे आमिष दाखवत एकांत ठिकाणी बोलावून प्राणघातक हल्ला करून लुटमार केल्याची धक्कादायक घटना नंदुरबार तालुक्यात घडली आहे. या प्रकरणी नंदुरबार पोलिसांनी तातडीने कारवाई करत सहा संशयितांना अटक केली आहे. हल्ल्यात चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १३ फेब्रुवारी २०२६ रोजी श्री. परमिंदरसिंग अमरजितसिंग (व्यवसाय – फास्टफूड, रा. न्यू सुखियाबाद, ता. जि. होशियारपूर, पंजाब) यांच्या तक्रारीवरून नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Crime News
Nandurbar Crime |धक्कादायक : नंदुरबारमध्ये वाळू तस्करांची तहसीलदारांना धक्काबुक्की

फिर्यादीला काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरील इन्स्टाग्रामवरील व्हिडिओच्या माध्यमातून संपर्क साधण्यात आला होता. संबंधित व्यक्तीने १० हजार रुपयांच्या बदल्यात १ लाख रुपये देण्याचे आमिष दाखवले. त्यानुसार फिर्यादी व त्यांचे मित्र यांना नंदुरबार तालुक्यातील आष्टा गावाजवळील एकांत टेकडीवर बोलावण्यात आले.

तेथे पोहोचताच आरोपींनी धमक्या देत जबरदस्तीने पैसे मागण्यास सुरुवात केली आणि मारहाण केली. परमिंदरसिंग व त्यांच्या चार मित्रांना बेदम मारहाण करून त्यांच्याकडील रोख रक्कम व मोबाईल असा एकूण सुमारे ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जबरीने लुटण्यात आला.

Crime News
Nandurbar Bribe | PWD च्या उपअभियंत्याला ८ लाखांची लाच घेताना रंगेहात अटक

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी हेमंत पाटील तसेच नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी दिनेश भदाणे यांना तातडीने तपासाच्या सूचना दिल्या. त्यानुसार तपास पथके रवाना करण्यात आली.

तपासादरम्यान समशेर उर्फ नानदाद रमेश भोसले (वय ३०), करमेश राष्ट चव्हाण (वय २४), प्रभू बालिश पवार (वय २९), परेशलाल उगलाल चव्हाण (वय २०), गुलूपसी हाटादाजी भोसले (वय ३५) आणि अमित उर्फ टाटा रुबाब पवार (वय २९), सर्व रा. जामदे, ता. साक्री, जि. धुळे, अशा सहा संशयितांना अटक करण्यात आली.

Crime News
Kirit Somaiya Nandurbar | अचानक नंदुरबार दौरा करून किरीट सोमय्या यांनी बनावट दाखला प्रकरणात केली छाननी

आरोपींकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेला एकूण २ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल गुंजाळ (नंदुरबार तालुका पोलीस ठाणे) करीत आहेत.

दरम्यान, नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या आमिषांना बळी न पडता आर्थिक व्यवहार करताना योग्य ती पडताळणी करावी व सावधगिरी बाळगावी, असे आवाहन जिल्हा पोलीस प्रशासनाने केले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news