Kirit Somaiya Nandurbar | अचानक नंदुरबार दौरा करून किरीट सोमय्या यांनी बनावट दाखला प्रकरणात केली छाननी

११२२ लाभार्थ्यांविरोधात गुन्हे दाखल करावेत तसेच संबंधित सर्व दाखले आणि त्यावर आधारित तयार करण्यात आलेली कागदपत्रे तातडीने रद्द करण्याची मागणी
Fake Certificate Scam Nandurbar
Kirit SomaiyaPudhari
Published on
Updated on

Fake Certificate Scam Nandurbar

नंदुरबार : नंदुरबारमधील बनावट जन्म-मृत्यू नोंदणी रॅकेट प्रकरणात भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी थेट उडी घेत अचानक नंदुरबार नगरपालिकेला भेट देत प्रकरणाची सखोल छाननी केली. या रॅकेटद्वारे बनावट दाखले मिळवलेल्या ११२२ लाभार्थ्यांविरोधात गुन्हे दाखल करावेत तसेच संबंधित सर्व दाखले आणि त्यावर आधारित तयार करण्यात आलेली कागदपत्रे तातडीने रद्द करण्यात यावीत, अशी ठाम मागणी त्यांनी यावेळी केली.

नंदुरबारमध्ये दोन आठवड्यांपूर्वी पोलिसांनी बनावट जन्म-मृत्यू दाखल्यांचे रॅकेट उघडकीस आणत सहा जणांना अटक केली होती. या पार्श्वभूमीवर सोमय्या यांनी सोमवारी सायंकाळी नंदुरबार नगरपरिषद, शहर पोलीस स्टेशन व जिल्हाधिकारी कार्यालयास भेट देत संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

Fake Certificate Scam Nandurbar
Nandurbar Crime | बनावट जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांच्या रॅकेटचा पर्दाफाश; नंदुरबारमध्ये वकिलासह पाच जण अटकेत

पत्रकारांशी बोलताना सोमय्या यांनी सांगितले की, नंदुरबार नगरपालिकेतील काही अधिकारी व दोन एजंट यांच्या संगनमताने ११२२ बनावट जन्म-मृत्यू दाखले वितरित करण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे, या लाभार्थ्यांनी साधा अर्जही न करता त्यांना दाखले कसे देण्यात आले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आतापर्यंत या प्रकरणात ५४ बनावट प्रमाणपत्रे तपासात निष्पन्न झाली असून उर्वरित दाखल्यांची चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

या सर्व ११२२ बोगस लाभार्थ्यांविरोधात गुन्हे दाखल करावेत व त्यांचे दाखले तात्काळ रद्द करावेत, अशी मागणी सोमय्यांनी प्रशासनाकडे केली. पोलीस कारवाई टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत, या प्रकरणात कारवाई अटळ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच बनावट दाखल्यांच्या आधारे मिळवलेले पासपोर्ट, आधारकार्ड व अन्य शासकीय कागदपत्रेही रद्द करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी शासन निर्णयही अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

Fake Certificate Scam Nandurbar
Nandurbar Bribe | 65 हजाराची लाच स्वीकारताना मत्स्य व्यवसाय अधिकार्‍याला अटक; नंदुरबारमध्ये खळबळ

रॅकेटमागील मास्टरमाइंड शोधण्याची गरज

हे रॅकेट केवळ कनिष्ठ कर्मचाऱ्यांचे काम नसून यामागील मुख्य सूत्रधार कोण आहे, याचा शोध घेणे आवश्यक असल्याचे सोमय्या यांनी नमूद केले. या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचेही त्यांनी सांगितले.

जामीया प्रकरणात पुन्हा कारवाईचे संकेत

याच दौऱ्यात अक्कलकुवा येथील जामिया इस्लामिया प्रकरणावरही अधिकाऱ्यांशी चर्चा झाल्याचे सोमय्या यांनी सांगितले. या प्रकरणात पुढील आठवड्यात आणखी एक मोठी कारवाई अपेक्षित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विदेशी देणग्यांवर बंदी असतानाही जामियाला परदेशातून निधी मिळाल्याचा संशय असून, त्या देणग्यांचीही चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच राज्यातील मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.

Fake Certificate Scam Nandurbar
Nandurbar Crime | विमा एजंटचा धक्कादायक कारनामा; जिवंत विमाधारकाचा बनावट मृत्यू दाखवून एलआयसीत पावणेकोटींचा अपहार

विशेष पथक नेमण्याची मागणी

दरम्यान, भाजप नगरसेवकांनी या प्रकरणासाठी विशेष तपास पथक नेमावे, अशी मागणी करणारे निवेदन सोमय्या यांना सादर केले. विरोधी पक्षनेते हिरालाल चौधरी यांनी प्रकरणाचे गांभीर्य त्यांच्यासमोर मांडले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष निलेश माळी, गटनेते आनंदा माळी, शहराध्यक्ष नरेश कांकरिया, नगरसेवक पंकज चौधरी, आकाश चौधरी, निखिल चौधरी, सतीश मराठे, माणिक माळी, अॅड. प्रकाश भोई यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news