Nandurbar Crime |धक्कादायक : नंदुरबारमध्ये वाळू तस्करांची तहसीलदारांना धक्काबुक्की

तहसीलदार प्रदीपकुमार रावसाहेब पवार यांची उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार
  Crime News
Crime NewsFile Photo
Published on
Updated on

Sand Smugglers Attacked Tehsildar Nandurbar

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील वाळू तस्करांची दादागिरी वाढली असून थेट तहसीलदारांच्या अंगावर धावून धक्काबुक्की करण्याचा प्रकार घडवला गेल्याने खळबळ उडाली आहे. उपनगर पोलीस ठाण्यात तहसीलदारांनी याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील वाळू तस्करांची दादागिरी दिवसेंदिवस वाढत चालली असून मंडळ अधिकारी व तलाठी पदावरील अधिकाऱ्यांच्या घरात घुसून मारहाण करण्यापर्यंतच्या घटना याच्या पूर्वीही घडवल्या गेल्या आहेत. तीन आठवड्यांपूर्वी भरारी पथकातील अधिकाऱ्याला मारहाण करण्याची घटना घडली होती. त्याविषयी गुन्हा दाखल होऊन काही दिवस उलटले असतानाच आता स्वतः तहसीलदार यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न घडला.

  Crime News
Nandurbar Crime | बनावट जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांच्या रॅकेटचा पर्दाफाश; नंदुरबारमध्ये वकिलासह पाच जण अटकेत

या प्रकरणी नंदुरबार येथील तहसीलदार प्रदीपकुमार रावसाहेब पवार (वय ३४) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, अवैध वाळू वाहतुकीची तपासणी करण्यासाठी भरारी पथक गेले असता नंदुरबार शहरातील सी.बी पेट्रोल पंप जवळ सार्व. रोडवर एका ट्रकला अडवण्यात आले. कागदपत्रांची मागणी करण्यात आली. त्याप्रसंगी ट्रक चालक गौरव सुरेश महिरे (वय २२) आणि क्लीनर पंकज राहुल बाविस्कर (वय २६, दोघे रा. पहेलवान नगर नंदुरबार) या दोघांनी अंगावर धावत येऊन तहसीलदार प्रदीप पवार यांना धक्काबुक्की केली.

पथकातील कर्मचाऱ्यांना देखील त्यांनी धक्काबुक्की केली. स्वतः तहसीलदार यांना धक्काबुक्की करण्यापर्यंत वाळू तस्करांनी मजल गाठल्या बद्दल संतप्त भावना उमटल्या आहेत. हा धक्काबुक्कीचा प्रकार दिनांक 12 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री सात वाजून पन्नास मिनिटांनी घडला. नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात दिनांक 13 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी याबद्दल गुन्हा नोंदवण्यात आला. दरम्यान पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून अधिक तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news