नंदुरबार : पोलीस आरोग्य संवर्धन अभियानातून पोलीस दलाची तपासणी

नंदुरबार : पोलीस आरोग्य व संवर्धन अभियानामध्ये पोलीस दलाची तपासणी करताना वैद्यकीय अधिकारी. (छाया: अंबादास बेनुस्कर) 
नंदुरबार : पोलीस आरोग्य व संवर्धन अभियानामध्ये पोलीस दलाची तपासणी करताना वैद्यकीय अधिकारी. (छाया: अंबादास बेनुस्कर) 
Published on
Updated on

नंदुरबार: पुढारी वृत्तसेवा

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांच्या हस्ते "पोलीस आरोग्य व संवर्धन" अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याच्या वैद्यकीय शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा पोलीस दलाच्या वैद्यकीय तपासणी शिबिराच्या माध्यमातून नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आरोग्य संतुलन राखण्याचे अभियान जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या संकल्पनेतून चालवले जात असल्याबद्दल गौरवोद्गार काढले.

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. पाटील हे नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वार्षिक तपासणीसाठी नंदुरबार येथे आले.  त्यांनी सांगितले की, पोलीस दलाचे कामकाज हे आव्हानात्मक असून दैनंदिन कामकाज करतांना पोलीसांवर वेगवेगळ्या प्रकारे तणाव येत असतो. त्या शारीरिक व मानसिक तणावातून मार्ग काढून सकस आहार व योग्य व्यायाम याद्वारे व्याधींपासून दूर राहू शकतो. मागील काही वर्षापासून जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार यांचेसाठी तातडीने व चांगल्या उपचारासाठी नंदुरबार जिल्ह्यातील कोणत्याही रुग्णालयाशी करार नसल्याने जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना उपचारासाठी शेजारच्या धुळे अथवा इतर जिल्ह्यात जावे लागत होते. पी. आर. पाटील यांनी अधिकारी व अंमलदार यांची अडचण लक्षात घेवून शहरातील स्मीत मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटलसोबत महात्मा फुले कुटुंब आरोग्य योजनेंतर्गत (MPKAY) नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचा करार करून जिल्ह्यातील अधिकारी व अंमलदार यांची आरोग्य विषयक महत्वाची अडचण दूर केली आहे. यावेळी जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार व त्यांच्या परिवारातील सदस्य यांची मोफत नेत्र तपासणी करून दृष्टीदोष असणा-यांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. तसेच तपासणी दरम्यान मोतीबिंदू असणाऱ्या 5 अंमलदारांचे मोतीबिंदूचे मोफत ऑपरेशन प्रस्तावित करण्यात आले आहे. याच अभियानाचा भाग म्हणून नंदुरबार जिल्हा पोलीस दल व नारी संस्था, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने नाममात्र शुल्क आकारून हिपॅटायटीस – A व B या लसोचे लसीकरण सुरु करण्यात आले आहे.

अभियानाचा सर्वात महत्वाचा भाग म्हणून जिल्हा पोलीस दलातील एकूण 1218 पोलीस अधिकारी व अंमलदार यांची स्मित हॉस्पीटल मार्फत मोफत रक्त तपासणी करण्यात आली. मोफत रक्त तपासणी केल्यानंतर ज्या अधिकारी व अंमलदार यांना हृदयविकार, उच्च रक्तदाब, मधुमेह, पाठ, कंबर आणि मणकेदुखी तसेच रक्तासंबंधी आजार (HB, अनिमीया ) निष्पन्न झाले आहे. त्यांच्या सखोल वैद्यकीय तपासणी शिबीराची सुरुवात शुक्रवार (दि.3) पासून करण्यात आली. तसेच 'पोलीस आरोग्य व संवर्धन या अभियानांतर्गत अधिकारी / अंमलदार यांची पूर्ण शारीरिक तपासणी होवून प्रत्येकाची वैयक्तीक आरोग्य विषयक माहिती (Medical Profile File) संकलीत करून प्रत्येक पोलीस अधिकारी / अंमलदार यांची एक फाईल पोलीस अधीक्षक कार्यालयात ठेवण्यात येणार आहे व त्याआधारे प्रत्येक पोलीस अधिकारी अंमलदार यांची शारीरिक मानसिक क्षमता निश्चित करून त्यानुसार भविष्यात कामकाजाचे मूल्यमापन व नियोजन करण्याचा मानस असल्याचे पी. आर. पाटील यांनी सांगितले,

अभियानात नंदुरबार जिल्हा पोलीस दलाला मदत करणान्या स्मित हॉस्पीटलचे संचालक डॉ. विजय पटेल, डॉ. तेजल चौधरी, डॉ. शब्बीर मेमन, व्यवस्थापक डॉ. भरत पटेल तसेच तेथील कार्यरत डॉ. रोहित पटेल व डॉ. कल्पेश चौधरी यांचे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. डॉ. विजय पटेल यांनी मनोगत व्यक्त केले. त्यात 30 टक्के पेक्षा अधिक पोलीसांना आरोग्याच्या समस्या असून पोलीसांना किरकोळ त्रास जाणवल्यानंतर त्यांनी तातडीने वैद्यकीय उपचार केल्यास पुढील आरोग्यविषयक गुंतागुंत टाळता येवू शकते असे सांगितले. कार्यक्रमाच्या वेळी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील, नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक. निलेश तांबे. नंदुरबार उपविभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, अक्कलकुवा उपविभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संभाजी सावंत, शहादा उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी  श्रीकांत घुमरे, पोलीस उप अधीक्षक विश्वास वळवी, पोलीस कल्याण शाखेचे पोलीस निरीक्षक सुनिल नंदवाळकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, जिल्ह्याचे विविध पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी व अमलदार उपस्थित होते.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news