नाशिक शहरात 10 हजार नळकनेक्शन अनधिकृत असल्याचा मनपाला संशय

file photo
file photo
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेला पाणीपट्टीतून मिळणारे उत्पन्न आणि त्या मोबदल्यात केला जाणारा पाणीपुरवठा यात कोणताही ताळमेळ लागत नसल्याने होणार्‍या पाणीगळतीचा मनपा शोध घेणार असून, अनधिकृत नळजोडणी शोधून संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे. शहरात जवळपास 10 हजारांहून अधिक नळजोडणी बेकायदेशीर असल्याचा मनपाला संशय आहे.

शहराचा वाढता विस्तार आणि त्यानुसार पुरवठा केल्या जाणार्‍या पाण्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. असे असताना नळजोडणीधारकांच्या संख्येत वाढ होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. लोकसंख्या वाढल्याने पाणीपुरवठा वाढलेला असताना महसुलात मात्र दिवसेंदिवस घट होत असल्याने सुरू असलेली पाणीगळती शोधण्यासाठी मनपाने पावले उचलली असून, अनधिकृत नळजोडणी शोधण्याची मोहीम हाती घेतली जाणार आहे. गेल्या 40 वर्षांत नाशिक शहराची लोकसंख्या सुमारे 20 लाखांवर पोेहोचली आहे. नाशिक शहराला सुरुवातीला गंगापूर धरण समूह तसेच दारणा धरणातून पाणीपुरवठा होतो. थेट जलवाहिनी योजनेद्वारे मुकणे धरणातूनही पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे सुमारे दोन लाख दोन हजार 626 नळजोडणीची नोंद आहे. महापालिकेच्या घरपट्टीधारकांची संख्या साडेचार लाख असताना नळजोडणीधारकांची संख्या निम्मीच कशी, असा प्रश्न उपस्थित केला जात असून, धरणातून उचलण्यात येणार्‍या एकूण पाण्याच्या तुलनेत 60 टक्केच पाण्याचा हिशेब लागत आहे. 40 टक्के पाणीगळती होत आहे. या पाणीचोरीला पाणी वितरण वाहिन्यांतील दोष जबाबदार आहेच; परंतु अनधिकृत नळजोडणीधारकही कारणीभूत आहेत.

नवीन नळजोडणीसाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे जोडणी दिली जाते. त्यासाठी पाणीपुरवठा विभागाकडे अर्ज करावा लागतो. परंतु, पाणीपट्टी वसुली करवसुली विभागामार्फत केली जाते. त्यामुळे अनधिकृत नळजोडणीची माहिती असूनही दोन्ही विभाग एकमेकांवर जबाबदारी ढकलत असल्याने महसूल मिळत नाही आणि अनधिकृत नळजोडणी धारकांवरदेखील कारवाई होत नाही. दोन्ही विभाग एकमेकांवर जबाबदारी ढकलत असल्याने कोट्यवधी रुपयांच्या महसुलावर मनपाला पाणी सोडावे लागते. नळजोडणी घेण्यासाठी अधिकृत प्लंबर्सची यादी महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. मात्र, याच प्लंबर्सच्या माध्यमातून अनधिकृत नळजोडणी घेतली जाते आणि मनपाकडून त्याकडे काणाडोळा केला जातो.

विभागनिहाय संख्या
विभाग – नळजोडणीधारक
सातपूर – 30,309
पंचवटी – 42,988
नवीन नाशिक – 55,650
नाशिकरोड – 33,345
नाशिक पश्चिम – 10,602
नाशिक पूर्व – 29,732
एकूण – 2,02, 626

पाणीगळती आणि अनधिकृत नळजोडणी शोधण्याकरता विविध कर आकारणी विभाग आणि पाणीपुरवठा विभागाद्वारे संयुक्त शोधमोहीम राबविली जाईल. अनधिकृत जोडणी आढळल्यास संबंधितांकडून पाणीपट्टी पूर्वलक्षी प्रभावाने वसूल केली जाईल.
– शिवाजी चव्हाणके, अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा विभाग

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news