T20 World Cup : मैदानात घुसला भारतीय चाहता, ठोठावला 6.50 लाखांचा दंड | पुढारी

T20 World Cup : मैदानात घुसला भारतीय चाहता, ठोठावला 6.50 लाखांचा दंड

अ‍ॅडलेड : टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) स्पर्धेत सुपर-12 मध्ये भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात सामना सुरू असतानाच एका भारतीय चाहत्या युवकाला जबरदस्तीने मैदानात घुसणे चांगलेच महागात पडले. यामुळे त्याला तब्बल 6.50 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

झिम्बाब्वेची फलंदाजी सुरू असताना 17 व्या षटकात हार्दिक पंड्या गोलंदाजी करत होता. पंड्या षटकातील पाचवा चेंडू टाकण्याच्या तयारीत असतानाच एक युवक जबरदस्तीने मैदानात घुसला आणि थेट कर्णधार रोहित शर्माजवळ पोहोचला. युवक मैदानात घुसल्याचे पाहून तातडीने सुरक्षा रक्षकांनी धाव घेतली आणि त्याला पकडून खेचत नेऊ लागले. मात्र, रोहित शर्माने सुरक्षा रक्षकांना त्या युवकाला आरामात मैदानाबाहेर घेऊन जाण्यास सांगितले. तसे पाहिल्यास प्रेक्षक जबरदस्तीने मैदानात घुसणे ही बाब नवी नाही. मात्र, यामुळे दंड ठोठावण्यात आल्याची ही दुर्मीळ घटना आहे. (T20 World Cup)

Back to top button