जळगाव : खाऊचे आमिष दाखवत चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्यास जन्मठेप

जळगाव : खाऊचे आमिष दाखवत चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्यास जन्मठेप

जळगाव पुढारी वृत्तसेवा  ; चाळीसगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या चिमुकलीला खाऊचे आमिष दाखवत अत्याचार करणाऱ्या संदीप सुदाम तिरमली (वय-३६, रा. शिरसगाव ता. चाळीसगाव) यास मरेपर्यंत जन्मठेप आणि ५  हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

चाळीसगाव तालुक्यातील एका गावात राहणा-या ५ वर्षीय चिमुकलीवर ३ जानेवारी २०२१ रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास घराशेजारीच मुलींमध्ये खेळण्यासाठी गेली असता संदीप सुदाम तिरमली याने या बालिकेला खाऊचे आमिष दाखवून हातात दहा रूपयाच्या तीन नोटा देवून घरात बोलावून तिच्यावर अत्याचार केला. चिमुकली रडत रडत घरी आल्यावर हा प्रकार समोर आला. तिच्यावर अत्याचार करणाऱ्या संदीप यास याबाबत हटकले असता तो पळून गेला. या घटनेनंतर पीडित मुलीच्या आई वडिलांच्या फिर्यादीवरून संदीप सुदाम तिरमली याच्या विरोधात पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

चिमुकलीवर अत्याचार करणारा संदीप तिरमली हा घटनास्थळावरून फरार झाला होता. पोलिसांनी त्याला अवघ्या दोन तासात अटक केली होती. सदर खटल्याची सुनावणी ही अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. एन. खडसे यांच्या न्यायालयासमोर झाली. त्यात शासकीय अभियोक्ता केतन ढाके यांनी एकूण ६ साक्षीदार तपासले.  यात फिर्यादी, पिडीतेचे वडील, पंच साक्षीदारांची साक्ष, तपासी अंमलदार व वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली.

तपासी अधिकारी हेमंत शिंदे यांनी केलेला तपास व सरकारपक्षातर्फे करण्यात आलेला प्रभावी युक्तीवाद यावरुन न्यायालयाने संदीप सुदाम तिरमली याला दोषी ठरवत पोक्सो कायद्यांतर्गत मरेपर्यंत जन्मठेप आणि पाच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

हेही वाचा :

logo
Pudhari News
pudhari.news