ओझर येथील अल्पवयीन मुलीचे अपहरण करणार्‍याला बेड्या ; जालन्यातून घेतले ताब्यात

ओझर येथील अल्पवयीन मुलीचे अपहरण करणार्‍याला बेड्या ; जालन्यातून घेतले ताब्यात

ओझर : पुढारी वृत्तसेवा : येथून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करणार्‍याला ओझर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने जालना येथून अटक केली. बुधवार, दि. 26 जानेवारीच्या रात्री येथील 16 नंबर चारी परिसरातून आपल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार तिच्या पालकांनी ओझर पोलिस ठाण्यात केली होती.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी या प्रकरणात लक्ष घातले. त्यानुसार पोलिस उपअधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ओझरचे निरीक्षक अशोक रहाटे, उपनिरीक्षक अर्चना तोडमल, गुन्हे शोध पथकाचे किशोर अहिरराव, अनुपम जाधव, जितेंद्र बागूल यांनी शोध सुरू केला होता.

ही मुलगी जालना जिल्ह्यातील मंठा येथे असल्याची माहिती पोलिसांना कळाली होती. त्यानुसार जालन्याकडे पोलिस पथक रवाना करण्यात आले. तेथे राकेश डोळे (रा. नांदगाव) याला मुलीसह एका झोपडीतून ताब्यात घेण्यात आले. तिला ओझरला आणून आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले. राकेशविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक अर्चना तोडमल, पोलिस नाईक स्वप्नील जाधव तसेच महिला पोलिस अधिक तपास करीत आहेत.

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज.. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. ? पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news