जळगाव, भुसावळ शहरावर पाणीटंचाईचे संकट

भुसावळ शहराचा बंधारा  खाली झाला.
भुसावळ शहराचा बंधारा खाली झाला.

जळगाव :  पुढारी वृत्तसेवा – तापी नदीच्या किनाऱ्यावर बसलेली भुसावळ शहर हे रेल्वेच्या दृष्टीने जंक्शन स्टेशन सुद्धा आहे. सद्य परिस्थितीत या शहरातील नागरिकांना बारा दिवसांनी पाणीपुरवठा नगरपालिकेच्या माध्यमातून होत आहे. शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या बंधाऱ्यातच पाणी नसल्यामुळे शहरात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. हतनुर धरणाचे पाणी रविवारी (दि.२६) रोजी बंधाऱ्यात पोहचणार असल्याने त्यामुळे दोन दिवसांनी पाणी बंदरात आल्यानंतरच शहराला त्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे.

भुसावळ शहर तापी नदीच्या किनाऱ्यावर वसलेले शहर आहे. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा हतनुर धरणातून देण्यात येणाऱ्या पाण्यातून होत असतो. मात्र शहराचे तापमान 47 अंशावर गेल्यामुळे तापीनदी मध्ये असलेल्या बंधाऱ्यामध्ये पाणी नसल्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणारी यंत्रणाच बंद पडलेली आहे.

शहराला ऐन उन्हाळ्यात आधीच बारा दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. 65 वर्षे जुन्या यंत्रणेच्या माध्यमातून शहराला पाणीपुरवठा होत आहे. त्यामध्ये 10 टीएमसी यंत्र सुरू आहे. तर दुसऱ्या यंत्राचे काम प्रगतीपथावर आहे. अशातच बंधाऱ्यामधील पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन झाल्याने बंधाऱ्यात पाणी उचलण्यासाठी ही पाणी शिल्लक राहिलेले नाही.

बंधाऱ्यामधील पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन झाल्याने बंधाऱ्यात पाणी उचलण्यासाठी ही पाणी शिल्लक राहिलेले नाही.
बंधाऱ्यामधील पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन झाल्याने बंधाऱ्यात पाणी उचलण्यासाठी ही पाणी शिल्लक राहिलेले नाही.

त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा हा बारा दिवसाहून पंधरा ते सोळा दिवसांवर गेलेला आहे. भुसावळ नगरपालिकेचे नियोजन कुठे ढासळले.  भुसावळचे तापमान 47 अंशावर गेलेले असताना नदीच्या बंधाऱ्यातील पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत आहे. याकडे कोणाचे लक्ष गेले नाही का? असे असताना त्यांनी पाण्याची मागणी लवकर का केली नाही ?ज्यामुळे लोकांना पाण्यासाठी आता तत्काळ राहावे लागत आहे. असे प्रश्न पाण्यासाठी टाहो फोडणा-या नागरिकांकडून विचारण्यात येत आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news