

जळगाव : जिल्ह्यात वाढते रस्ते अपघात रोखण्यासाठी, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वचपा बसवण्यासाठी आणि गुन्हेगारी कृत्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी २४ रोजी संपूर्ण जिल्ह्यात 'विशेष वाहन चेकिंग मोहीम' राबविण्यात आली.या विशेष वाहन चेकिंग मोहिमे' अंतर्गत १३ लाख ७१ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
पोलीस अधीक्षक, डॉ. महेश्वर रेड्डी यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व वाहतूक शाखांना कडक नाकाबंदी करून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने, जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे व वाहतूक शाखांनी आपली पथके तयार करून वाहनांची कसून तपासणी केली. या विशेष मोहिमेत प्रामुख्याने विना नंबर प्लेट वाहने आणि अल्पवयीन वाहन चालक यांच्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले होते.
२४ रोजी राबविण्यात आलेल्या या मोहिमेत एकूण ११०६ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून, एकूण १३लाख७१ हजार ४५० दंड वसूल करण्यात आला आहे.
कारवाईचे वर्गीकरण:
विना नंबर प्लेट केसेस
नंबर प्लेट नसलेल्या किंवा फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या एकूण ४६३ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून ४ लाख ४५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
अल्पवयीन वाहन चालक केसेस
वाहतूक नियमांचे उल्लंघन करून वाहन चालवणाऱ्या एकूण १०७ अल्पवयीन चालकांवर कारवाई करण्यात आली असून, यातून ४ लाख ०४ हजार ५००रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांकडे वाहन देऊ नये, याबाबत पोलिसांतर्फे आवाहन करण्यात येत आहे.
३. इतर केसेस
इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५३६ वाहनांवर कारवाई करून ५ लाख २१ हजार ९५०रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
ठळक कामगिरी:
सदर मोहिमेत जळगाव शहर वाहतूक शाखा, भुसावळ शहर, चाळीसगाव शहर वाहतूक शाखा तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.