

जळगाव: उत्तर महाराष्ट्राचे मानबिंदू आणि ‘सुवर्णनगरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरांनी नवे उच्चांक प्रस्थापित केले आहेत. गेल्या चार दिवसांत सोन्याच्या दरात प्रति तोळा ३,२०० रुपयांची वाढ झाली असून, चांदीच्या दरात तब्बल १७ हजार रुपयांची मोठी उसळी पाहायला मिळाली आहे. परिणामी चांदीने प्रति किलो २ लाख २२ हजार रुपयांचा टप्पा गाठला आहे.
जळगावच्या सराफ बाजारात २२ डिसेंबर रोजी २४ कॅरेट सोन्याचा दर १,३३,५०० रुपये होता. तो आज २५ डिसेंबर रोजी वाढून १,३६,७०० रुपयांवर पोहोचला आहे. अवघ्या चार दिवसांत सोन्याच्या भावात मोठी वाढ झाल्याने ग्राहकांसह व्यापाऱ्यांमध्येही चर्चा रंगली आहे.
चांदीच्या दरातही मोठी चढउतार आणि तेजी दिसून आली. २२ डिसेंबर रोजी प्रति किलो २,०५,००० रुपये असलेली चांदी आज २५ डिसेंबर रोजी २,२२,००० रुपयांवर स्थिरावली आहे. चार दिवसांत चांदीच्या दरात १७ हजार रुपयांची वाढ नोंदविण्यात आली आहे.
दैनंदिन बाजारभाव (प्रति १० ग्रॅम / प्रति किलो):
२२ डिसेंबर २०२५
२२ कॅरेट सोने: १,२२,२९० रुपये
२४ कॅरेट सोने: १,३३,५०० रुपये
चांदी: २,०५,००० रुपये
२३ डिसेंबर २०२५
२२ कॅरेट सोने: १,२४,५७० रुपये
२४ कॅरेट सोने: १,३६,००० रुपये
चांदी: २,१०,००० रुपये
२४ डिसेंबर २०२५
२२ कॅरेट सोने: १,२५,२०० रुपये
२४ कॅरेट सोने: १,३६,७०० रुपये
चांदी: २,२१,००० रुपये
२५ डिसेंबर २०२५
२२ कॅरेट सोने: १,२५,२०० रुपये
२४ कॅरेट सोने: १,३६,७०० रुपये
चांदी: २,२२,००० रुपये
सोन्या-चांदीच्या दरातील या सातत्यपूर्ण वाढीमुळे सराफ बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्या काहीशी घटली असली, तरी गुंतवणूकदारांमध्ये मात्र उत्सुकता कायम असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.