Jalgaon Election Mahayuti: जळगाव मनपासाठी महायुतीचे ‘मैत्रीपूर्ण’ पाऊल; जागावाटपावर एकमत

अंतिम ‘फॉर्म्युला’ लवकरच ठरणार; वरिष्ठांचा आदेश शिरसावंद्य असल्याची पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही
Jalgaon Election Mahayuti
Jalgaon Election MahayutiPudhari
Published on
Updated on

जळगाव: "राज्यातील महायुतीचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेला युतीचा आदेश आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. या आदेशाचे 'पथ्य' पाळून जळगाव महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) पूर्ण ताकदीनिशी एकत्र लढणार आहेत," अशी अधिकृत घोषणा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज केली. जळगाव शहरात बुधवारी (२४ डिसेंबर) सायंकाळी महायुतीच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली, त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

Jalgaon Election Mahayuti
Lalit Kolhe: कॉल सेंटर फसवणूक प्रकरणी माजी महापौर ललित कोल्हे यांचा जामीन रद्द

महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून, अर्ज भरण्याचे दोन दिवस पूर्ण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर महायुतीची पुढील दिशा ठरवण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह आमदार किशोर आप्पा पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार अमोल पाटील, शिवसेना जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे, भाजप खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण, माजी महापौर नितीन लड्डा आणि शहर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांसारख्या दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती.

Jalgaon Election Mahayuti
Jalgaon Shiv Sena MNS Alliance : : जळगावात ‘राज–उद्धव’ युतीचा जल्लोष

जागावाटपाचा तिढा सुटणार?

या बैठकीत भाजप आणि शिवसेना यांच्यात युती करण्यावर एकमत झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सोबतही चर्चा करून महायुती म्हणून एकत्रित सामोरे जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जागावाटपाचा नेमका 'फॉर्म्युला' अद्याप जाहीर झालेला नसला, तरी लवकरच तो निश्चित केला जाईल, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. "जागावाटप करताना निवडून येण्याची क्षमता हाच निकष असेल," असेही त्यांनी सूचित केले.

Jalgaon Election Mahayuti
Jalgaon Mahanagar Palika : ‘ना-हरकत’ दाखल्यांसाठी महापालिकेत उमेदवारांची मोठी गर्दी

'राज-उद्धव' युतीवर टोला

राज्यात शिवसेना (उबाठा) आणि मनसे यांच्यात झालेल्या युतीबाबत विचारले असता, गुलाबराव पाटील यांनी अत्यंत मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली. "दोन्ही पक्ष एकत्र आले, हे चांगलेच झाले," असा मिश्किल टोला त्यांनी लगावला.

Jalgaon Election Mahayuti
Silver Price Hike : जळगावच्या सराफ बाजारात चांदीच्या दरात थेट 11 हजार रुपयांची वाढ

अजित पवार गटाशीही चर्चेचे वारे

महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेना यांच्यात समन्वय झाला असला, तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला सोबत घेण्याबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे. तिन्ही पक्षांचे नेते एकत्र येऊन जळगाव शहराच्या विकासासाठी आणि विजयासाठी सामायिक रणनीती आखणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news