R D Burman : गाण्यासाठी चक्क पाठीवर थाप मारून साऊंड तयार केला; पंचमदांचा भन्नाट किस्सा वाचा

संगीताचा खरा अवलिया: पाठीवर थाप मारून ध्वनीनिर्मिती करणाऱ्या पंचमदांच्या आठवणींना जळगावात उजाळा
Jalgaon News R D Burman
Published on
Updated on

जळगाव : एखाद्या गाण्यासाठी नेमका हवा असलेला आवाज तयार करण्यासाठी आर. डी. बर्मन ऊर्फ ‘पंचमदा’ यांनी चक्क स्वतःच्या पाठीवर थाप मारून ध्वनी (साऊंड) तयार केला होता. संगीतातील प्रयोगशीलतेची ही अनोखी आठवण ज्येष्ठ वादक विजू काटकर यांनी जळगावात सांगितली. “कोणत्या गाण्यासाठी कशातून कोणता आवाज काढायचा, यात पंचमदांचा हात कोणीच धरू शकत नव्हता,” असेही त्यांनी सांगितले.

संगीतविश्वातील अजरामर नाव असलेल्या पंचमदांच्या आठवणींना जळगावात उजाळा मिळाला. पंचमदांचे तब्बल २५ वर्षे सहकारी आणि मॅनेजर राहिलेले भरत काका तसेच ज्येष्ठ वादक विजू काटकर जळगाव दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी पंचमदांच्या अद्भुत संगीतप्रवासातील अनेक आठवणींना उजाळा देण्यात आला.

Jalgaon News R D Burman
Jalgaon Illegal Sand Mining | गिरणा नदीपात्रात मोठी कारवाई; अवैध वाळू उपशावर हातोडा; ३ कोटी ३६ लाखांचा मुद्देमाल जप्त

वस्तूंच्या आवाजातूनही संगीताची निर्मिती पंचमदा हे केवळ उत्तम संगीतकार नव्हते, तर ते अव्वल दर्जाचे साऊंड इंजिनिअरही होते, असे भरत काका यांनी सांगितले. सर्वसामान्य वस्तूंपासून ते प्रत्येक वाद्यापर्यंत, कुठेही वेगळा आवाज ऐकू आला की पंचमदा तो लगेच रेकॉर्ड करत आणि त्यातून संगीताची नवी जादू निर्माण करत असत.

विजू काटकर यांनीही पंचमदांच्या प्रयोगशीलतेची आठवण सांगितली. “माझे वडील पंचमदांकडे वादक म्हणून काम करत होते. त्या काळात मीही त्यांच्या सहवासात होतो. कोणत्या गाण्यासाठी कशातून कोणता आवाज काढायचा, यात त्यांचा हात कोणीच धरू शकत नव्हता. एकदा तर त्यांनी एका गाण्यासाठी चक्क पाठीवर थाप मारून, वाजवून विशिष्ट साऊंड तयार केला होता,” असे त्यांनी सांगितले.

Jalgaon News R D Burman
Jalgaon Fraud | गोशाळेत नोकरीचे आमिष; दामदुप्पट परताव्याच्या आश्वासनाने २३.८३ लाखांची फसवणूक

“पंचमदा हे संगीताचा गाढा अभ्यास असलेले खरे अवलिया होते. मात्र, दुर्दैवाने असा सखोल अभ्यास आणि प्रयोगशीलता आजच्या पिढीत कुठेही दिसत नाही,” अशी भावनाही काटकर यांनी व्यक्त केली.

‘आजच्या संगीताला जीव नाही’ भरत काका यांनी पंचमदांच्या संगीताच्या आठवणींसोबतच आजच्या संगीत क्षेत्रावरही भाष्य केले. त्यांनी नंतरच्या काळात कविता कृष्णमूर्ती आणि श्रेया घोषाल यांच्यासोबतही काम पाहिले आहे.

“आजचे संगीत आधुनिक यंत्रांवर चालत असून नवे तंत्रज्ञान आले असले, तरी त्यात जीव नाही. वायोलिन, तबल्यासारखी पारंपरिक वाद्ये वाजवणारे खरे वादक आता उरलेले नाहीत. शास्त्रीय संगीतातील शिक्षक आणि समृद्ध नाट्यसंगीत आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहे,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

Jalgaon News R D Burman
Jalgaon police raid gambling racket |हायटेक चक्री जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा तिहेरी छापा, इंदूरच्या दोघांसह चौघे ताब्यात

देशातच नव्हे, तर परदेशातही आज पंचमदांच्या संगीताचे कोट्यवधी चाहते आहेत. वस्तू, वाद्ये आणि अगदी मानवी शरीरातूनही वेगळे ध्वनी शोधून त्यांचा संगीतासाठी वापर करण्याची त्यांची प्रयोगशीलता हीच त्यांच्या संगीतप्रवासाची वैशिष्ट्यपूर्ण ओळख होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news