Jalgaon Fraud | गोशाळेत नोकरीचे आमिष; दामदुप्पट परताव्याच्या आश्वासनाने २३.८३ लाखांची फसवणूक

पाचोऱ्यातील व्यक्तीकडून ११.८३ लाख रुपये आणि १२ लाखांची कार घेतल्याचा आरोप; एकाविरुद्ध गुन्हा दाखल
Jalgaon Fraud
Jalgaon FraudAI Photo
Published on
Updated on

Jalgaon Goshala Job Scam Investment Fraud

जळगाव : गोशाळेला शासकीय मान्यता मिळवून देऊन नोकरी लावण्याचे आमिष दाखविण्यासह नगरपालिका ठेक्यांसाठी पैसे देऊन दामदुप्पट परतावा मिळवून देण्याचे आश्वासन देत पाचोऱ्यातील एका व्यक्तीची २३ लाख ८३ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात जितेंद्र महारु आहिरे (रा. तलाठी कॉलनी, पाचोरा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अद्याप अटक झालेली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिल्डी बुद्रुक (ता. पाचोरा) येथील फूल विक्रेते शाम श्रीराम जाधव (वय ३२) यांचा आरोपी जितेंद्र आहिरे याने विश्वास संपादन केला. गोशाळेला शासकीय मान्यता मिळवून देऊन तेथे नोकरी लावून देतो, असे आश्वासन त्याने जाधव यांना दिले. तसेच आपला मामेभाऊ राजीव शिवाजी वाघ (रा. चाळीसगाव) हा चाळीसगाव नगरपालिकेत चांगल्या पदावर असून, नगरपालिका ठेके घेत असल्याचे सांगितले. हे ठेके चालविण्यासाठी पैशांची गरज असल्याचे सांगत पैसे दिल्यास दामदुप्पट रक्कम परत मिळेल, असे आमिष दाखविल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

Jalgaon Fraud
Jalgaon | मोबाईल टॉवरला गळती लावून डिझेल लंपास करणारा एलसीबीच्या जाळ्यात!

या आश्वासनांवर विश्वास ठेवून जाधव यांनी वेगवेगळ्या तारखांना रोख व ऑनलाइन माध्यमातून आरोपीला एकूण ११ लाख ८३ हजार रुपये दिले. याशिवाय, लग्नाला जायचे असल्याचे सांगून आरोपीने जाधव यांच्याकडील १२ लाख रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची इनोव्हा क्रिस्टा कार (क्रमांक एमएच ४८ बीएच ८६००) घेतल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.

अशाप्रकारे रोख व ऑनलाइन व्यवहारातील ११ लाख ८३ हजार रुपये आणि १२ लाख रुपये किमतीची कार, अशी एकूण २३ लाख ८३ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे.

Jalgaon Fraud
Jalgaon police raid gambling racket |हायटेक चक्री जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा तिहेरी छापा, इंदूरच्या दोघांसह चौघे ताब्यात

या प्रकरणी १७ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २.३३ वाजता पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र पाटील तपास करीत असून, पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news