Jalgaon police raid gambling racket |हायटेक चक्री जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा तिहेरी छापा, इंदूरच्या दोघांसह चौघे ताब्यात

Jalgaon gambling den - हायटेक चक्री जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा तिहेरी छापा, इंदूरच्या दोघांसह चौघे ताब्यात
Raid
RaidPudhari
Published on
Updated on

जळगाव : शहरातील अवैध जुगार अड्ड्यांविरोधात पोलिसांनी बुधवारी (१६ सप्टेंबर) एकाच दिवशी तीन ठिकाणी धडक कारवाया केल्या. उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या विशेष पथकाने एमआयडीसी आणि जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत चक्रावर (मशीनवर) सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर छापे टाकले. या कारवायांमध्ये इंदूर, मध्यप्रदेश येथील दोघांसह चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. यावेळी एकूण ५८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे विशेष पथकाने वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई केली.

सिंधी कॉलनीत दोन कारवाया

एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिंधी कॉलनी येथील खुपचंद साहित्य मार्केटमध्ये दुपारी १.३० वाजता पहिला छापा टाकण्यात आला. या कारवाईत आनंद सुनील माचरे (३२, रा. संजय गांधी नगर, सिंधी कॉलनी रोड, जळगाव) याच्याकडून ३ हजार रुपये रोख, १५ हजार रुपये किमतीचा ५० इंची व्हिडिओकॉन कंपनीचा एलईडी टीव्ही, ५ हजार रुपयांचा एचपी कंपनीचा यूपीएस, किबोर्ड व माऊस असा एकूण २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Raid
Jalgaon News : आदिवासींच्या मागण्यांवर प्रशासनाची यशस्वी शिष्टाई; आठ दिवसांनंतर उपोषण अखेर मागे!

यानंतर त्याच परिसरात दुपारी ४ वाजता दुसरी कारवाई करण्यात आली. राम सुरेश भाट (२९, रा. सिंधी कॉलनी, कंजरवाडा, जळगाव) याच्याकडून २ हजार ५०० रुपये रोख, १० हजार रुपये किमतीचा ४३ इंची क्राऊन कंपनीचा एलईडी टीव्ही, ५ हजार रुपयांचा फ्रॉनटेक कंपनीचा सीपीयू, कीबोर्ड व माऊस असा १७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन्ही प्रकरणांत एमआयडीसी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार कलम ४ व ५ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Raid
Jalgaon Nashirabad Diesel Theft |नशिराबाद परिसरात 'डिझेल चोरांचा' धुमाकूळ! दोन टॉवरवरून ४० हजारांचे ४५० लिटर डिझेल लंपास

भास्कर मार्केटमध्ये तिसरा छापा

जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भास्कर मार्केटमधील एका खोलीवर सायंकाळी ७.३० वाजता तिसरा छापा टाकण्यात आला. या कारवाईत मध्य प्रदेशातील इंदूर येथील कान्हा मोसम चौरसिया (वय २६) आणि जगदीश रमेशचंद्र गुजवार (वय ३९) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून ५ हजार ३०० रुपये रोख, क्राऊन कंपनीचे ४३ व ३२ इंची दोन एलईडी टीव्ही, फ्रॉनटेक कंपनीचा सीपीयू, कीबोर्ड व माऊस असा एकूण १८ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार कलम ४ व ५ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

एका दिवसात १० हजार ८०० रुपये रोख जप्त

तिन्हीही कारवायांमध्ये पोलिसांनी एकूण १० हजार ८०० रुपये रोख आणि एलईडी टीव्ही, सीपीयू, यूपीएस, की-बोर्ड, माऊस व अन्य साहित्य असा एकूण ५८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कारवाईत चौघांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यापैकी दोघे मध्य प्रदेशातील इंदूर येथील आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे व उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल सचिन सुरेश साळुंखे, पोलीस अंमलदार आवेश आरिफ शेख, पोलीस कॉन्स्टेबल प्रणय सुरेश पवार, अमोल ठाकूर, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल गिरीश दिलीप पाटील, जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश शिरसाळे, पोलीस कॉन्स्टेबल समाधान रमेश पाटील व पोलीस हेड कॉन्स्टेबल मिलिंद सोनवणे यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news