गांधी रिसर्च फाउंडेशनद्वारा ‘मोहन लिला’ यावर आचार्य श्रीवत्स गोस्वामी यांचे व्याख्यान

आचार्य श्रीवत्स गोस्वामी
आचार्य श्रीवत्स गोस्वामी

जळगाव – समाजसेवा आणि सिद्धांतनिष्ठ कर्मयोगाची प्रेरणा भगवान श्रीकृष्ण यांनी भगवतगीतेतून दिली. याच भगवत गीतेला आपल्या कृतीतून आचरणात आणणारे महात्मा गांधी, श्रीकृष्णाने सांगितलेल्या कर्मयोगातून गांधीजींचे तत्त्वज्ञान, यावर गांधी रिसर्च फाऊंडेशनद्वारा 'मोहन लीला' कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यामध्ये वृंदावनच्या राधारमण मंदिराचे उपासक आचार्य श्रीवस्त गोस्वामी मार्गदर्शन करतील. 'मनमोहन' ते 'मोहनादास' पर्यंतचा प्रवास ते उलगडतील. यावेळी ओडिसा नृत्यशैलीतून मोहन लिलांची अनोखी प्रस्तूती नृत्यांगना विष्णुप्रिया गोस्वामी करेल. गांधी तीर्थ येथील कस्तूरबा सभागृह येथे दि. ४ मार्च ला दुपारी ३.३० ला मोहन लिला हा भारतीय संस्कृती आणि विचारधारेचा प्रवाह यावर हा विशेष कार्यक्रम होईल.

मोहन अर्थात श्रीकृष्णाने भगवत गीतेत सत्यदर्शनासाठी वास्तवतेला धरून कर्मयोगातून वसुधैव कुटुंबकम ही सर्वाेदयावर आधारित व्यवस्थतेतून श्रमाला महत्त्व दिल्याचा संदेश दिला. याच गीतेचा सारांश आपल्या जीवनात कृतीशील आचरणात आणून 'दुसऱ्याचे भले हेच माझे भले' ही भावना ठेऊन श्रीकृष्णाने सांगितलेल्या जीवनसुत्रांनुसार सत्याग्रही, एकादश, अहिंसा महात्मा गांधीजींनी अवलंबली. त्यागातूनच जीवन समझता येते ही शिकवण दिली. दांडी यात्रेत सहभागी झालेल्यांना अधर्मासाठी अहिंसा मार्गाने लढण्याचे बळ मिळावे, त्यासाठी श्रीमतभगवगीतेचा अनासक्तियोग ही पुस्तक वाचण्यास दिलीत. अशा विविध पैलूंवर न्यूयार्कच्या रिलीजन फॉर पीस चे मानद हिंदू अध्यक्ष आचार्य श्रीवत्स गोस्वामी मार्गदर्शन करतील. त्यांची नात कु. विष्णुप्रिया गोस्वामी ही ओडिसी नृत्यातून श्रीकृष्णाच्या बाललिला, गोकूळ, वृदांवनातील विविध दाखल्यांवर सादरीकरण करेल. गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे आयोजित व्याख्यान व नृत्य प्रस्तूतीसाठी जळगावकरांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संचालक अशोक जैन यांनी केले आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news