Bade Miyan Chote Miyan मधील अक्षय कुमार-टायगर श्रॉफचं 'मस्त मलंग झूम' गाणं रिलीज | पुढारी

Bade Miyan Chote Miyan मधील अक्षय कुमार-टायगर श्रॉफचं 'मस्त मलंग झूम' गाणं रिलीज

पुढारी ऑनलाईन डेस्क : आगामी ॲक्शन थ्रिलर ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ मधील दुसरे गाण ‘ मस्त मलंग झूम’ हे प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ( Bade Miyan Chote Miyan ) अक्षय कुमार आणि बॉलिवूडचा तरुण ॲक्शन सुपरस्टार टायगर श्रॉफ यांच्या समावेश पाय-टॅपिंग डान्स मूव्ह असलेलं हे गाणं नक्कीच प्रेक्षकांना आकर्षित करणार यात शंका नाही. ( Bade Miyan Chote Miyan )
अरिजित सिंग, विशाल मिश्रा आणि निखिता गांधी यांनी हे गाणं गायल असून विशाल मिश्रा यांनी संगीत दिले आहे तर इर्शाद कामिल यांनी गाणं लिहिल आहे. बडे मियाँ छोटे मियाँच्या साउंडट्रॅकमध्ये हे गाणे चार चाँद लावून जाणार आहे. टायगर श्रॉफ चा #TigerEffect या गाण्यातून दिसणार आहे.  पूजा एन्टरटेन्मेंट आणि एएझेड फिल्म्स निर्मित, अली अब्बास जफर दिग्दर्शित या चित्रपटात पृथ्वीराज सुकुमारन, सोनाक्षी सिन्हा, मानुषी छिल्लर, अलाया एफ आणि रोनित रॉय यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

Back to top button