Nashik Crime News : दुचाकीच्या डिक्कीतून २ लाख ७५ हजार रुपये चोरीला | पुढारी

Nashik Crime News : दुचाकीच्या डिक्कीतून २ लाख ७५ हजार रुपये चोरीला

नाशिक : दुचाकीच्या डिक्कीचे लॉक उघडून पैशांची पिशवी घेऊन चोरटा पसार झाला. शरणपूर रोडवरील राका कॉलनी येथे मंगळवारी (दि.२७) दुपारी तीनच्या सुमारास हा प्रकार घडला. राहुल पुरकर (२७, रा. जेलरोड) यांच्या फिर्यादीनुसार, चोरट्याने डिक्कीतून पिशवी काढून २ लाख ७५ हजार रुपये चोरून नेले. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस तपास करीत आहेत.

देवळाली गावात महिलेची पोत लंपास

देवळाली गावातील सोमवार बाजार येथे चोरट्याने महिलेच्या गळ्यातील ७५ हजार रुपयांची सोन्याची पोत लंपास केली. बिस्मी सुरेश (रा.आर्टिलरी सेंटर) यांच्या फिर्यादीनुसार, सोमवारी (दि.२६) सायंकाळी ७.३० वाजता चोरट्याने गर्दीचा फायदा घेत पोत चोरून नेली. याप्रकरणी उपनगर पोलिस तपास करीत आहेत.

जेलरोडला एकास मारहाण

धक्का लागल्याची कुरापत काढून चौघांनी मिळून दिगंबर कापसे (३८, रा. जेलरो) यांना मारहाण केल्याची घटना जेलराेड येथील तलाठी कार्यालयाजवळ घडली. कापसे यांच्या फिर्यादीनुसार, चौघांनी शुक्रवारी (दि.२३) रात्री दहा वाजता कुरापत काढून मारहाण केली. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात चौघांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

Back to top button