Jalgoan News I जिल्ह्यातून पावणे दोन लाखांच्या मोटरसायकल लंपास

Jalgoan News I जिल्ह्यातून पावणे दोन लाखांच्या मोटरसायकल लंपास
Published on
Updated on

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

जिल्हा पोलीस प्रशासनाने गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई तसेच स्थानबद्ध कारवाई, मोका, हद्दपारी अशा अनेक कारवाईचा बडगा उचलला आहे. ही कारवाई सुरु असताना मोटरसायकल चोरीचा धुमाकूळ मात्र अद्यापही सुरुच आहे. जिल्ह्यातून पुन्हा चार मोटरसायकली लंपास झाल्या असून त्याची किंमत पावणेदोन लाख रुपये आहे. याप्रकरणी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

जिल्ह्यामध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून घरफोडी, जबरी चोरी, मोटरसायकल चोरी अशा विविध प्रकारच्या गंभीर घटना दररोज  घडत आहेत. मोटरसायकल चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून पोलीस प्रशासन या गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी कारवाई करीत आहेत. 2023 मध्ये दोन मोका तर एकूण 56 जणांवर एमपीडी अंतर्गत स्थानबद्धची कारवाई करण्यात आली आहे. प्रतिबंधात्मक कारवाई अंतर्गत 2023 मध्ये 11920 जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे. असे असतानाही मोटरसायकल चोरीचे गुन्ह्यांची संख्येत घट होत नसल्याचे आकडेवारीवरून समाेर येत आहे. जळगाव शहरातील गोलाने मार्केट महाराजांच्या समोरून निलेश दत्तू बारी यांची 25 हजार रुपये किमतीची मोटरसायकल अज्ञात चोरट्याने लांबवली तसेच गोलाने मार्केट हनुमान मंदिर जवळील आपला ज्यूस सेंटर समोरून होंडा शाइन ही पन्नास हजार रुपये किमतीची मोटरसायकल अज्ञात चोरट्यांनी दि. 18 रोजी लांबवली. तसेच भडगाव तालुक्यातील तांदलवाडी समाधान कल्याण पवार या शेतकऱ्याच्या राहत्या घरात समोरून साठ हजार रुपयाची होंडा शाइन चोरट्याने लांबवली. पारोळा तालुक्यातील ढोली येथील बापूराव पंडित पाटील यांच्या घरासमोरून 35 हजार रुपयाची मोटर सायकल लांबविण्यात आली. अज्ञात चोरट्यांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news