

कर्जत : पुढारी वृत्तसेवा : देशातील प्रत्येक गरीब नागरिकाला त्याच्या हक्काचे घर देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. गोरगरीब जनतेसाठी अनेक योजना त्यांनी राबविल्या आहेत, असे प्रतिपादन खासदार सुजय विखे यांनी केले. कर्जत तालुक्यामध्ये विविध विकासकामांचा प्रारंभ गुरूवारी खासदार विखे यांच्या हस्ते झाला.
कर्जत येथील महात्मा गांधी विद्यालयासमोरील मैदानामध्ये झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, दादासाहेब सोनमाळी, सभापती काकासाहेब तापकीर, सचिन पोटरे, अंकुशराव यादव, शेखर खरमरे, सुनील यादव, बापूसाहेब नेटके, सोमनाथ शिंदे, बाळासाहेब शिंदे, संजय भैलुमे, अनिल गदादे, सागर लाळगे, पांडुरंग शिरसागर, धनंजय आगम, नीता कचरे, मोहिनी पिसाळ, आशा वाघ, राणी गदादे, अश्विनी दळवी, मनीषा वडे, आरती थोरात, दिग्विजय देशमुख आदींसह मोठ्या संख्येने महिला व नागरिक उपस्थित होते.
खासदार विखे म्हणाले, राम मंदिराचे शेकडो वर्षांचे देशातील नागरिकांचे स्वप्न पंतप्रधान मोदी यांच्यामुळे पूर्ण होत आहे. प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा हा ऐतिहासिक सोहळा एकट्या भाजपाचा नसून, हा सर्व भारतीयांचा आहे. त्यामुळे 22 जानेवारीला प्रत्येक नागरिकाने आपल्या घरी दिवाळी साजरी करावी. दादासाहेब सोनमाळी म्हणाले, खासदार विखे यांनी कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचण्याचे काम त्यांनी केले आहे. यावेळी शेखर खरमरे यांचे भाषण झाले. अंबादास पिसाळ यांनी आभार मानले.
हेही वाचा