Jalgaon Temperature|'मे' हिटचा चटका 'एप्रिल'मध्येच! जळगावचा पारा ४२.५ अंशावर

सलग दुसऱ्या दिवशी तापमान वाढले; ४२.५ अंशावर पारा, दुपारच्या वेळी रस्ते पडले ओस
Temperature
Temperature Pudhari
Published on
Updated on

Jalgaon Temperature increased

जळगाव : जळगाव जिल्ह्याच्या तापमानाचा पारा आता ४२.५ पार गेल्याने जिल्ह्याचे तापमान 'हॉट' झाले आहे. गेल्या २४ तासांत तापमानात ४ अंशांची वाढ नोंदवली गेली असून, १५ एप्रिल रोजी जळगावचे कमाल तापमान चक्क ४२.५ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. वाढत्या उष्णतेमुळे आणि कोरड्या हवेमुळे जळगावकरांच्या अंगाची लाहीलाही होत असून, दुपारी १२ नंतर शहरात रस्ते ओस पडल्याचे चित्र आहे.

वाढता पारा, घटती आर्द्रता

१४ एप्रिल रोजी जळगावचे कमाल तापमान ४२.१ अंश सेल्सिअस होते, तर किमान तापमान २४.३ अंश होते. मात्र, १५ एप्रिलला यात अधिकच भर पडली. कमाल तापमानाने ४२.५ अंशांचा टप्पा गाठला असून किमान तापमान २४.१ अंशांपर्यंत खाली आले आहे. विशेष म्हणजे हवेतील आर्द्रता ६० टक्क्यांवरून थेट ५४ टक्क्यांवर आली आहे. हवा कोरडी झाल्याने उन्हाच्या झळा अधिक तीव्रतेने जाणवत आहेत.

Temperature
Nashik Bribery Case | खाकीला काळिमा! शनिपेठेत लाचेचा 'शनि' नडला; 1 लाखाची लाच घेताना पोलीस नाईक जाळ्यात

जळगावकरांची स्थिती

उन्हाचा कडाका इतका भीषण आहे की, दुपारच्या वेळी अत्यावश्यक कामाशिवाय कोणीही घराबाहेर पडत नाहीये. शीतपेये, उसाचा रस आणि कलिंगडाच्या गाड्यांवर मात्र नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र, वाढत्या उष्णतेमुळे उष्माघाताचा धोका वाढला असून आरोग्य विभागाने काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

Temperature
Jalgaon Crime: साखळी चोरांचा 'डॉन' जेरबंद; सादिक अली उर्फ 'आतंक' अटकेमुळे अनेक जिल्ह्यांतील गुन्ह्यांचा उलगडा होणार

१४ एप्रिल: कमाल ४२.१°C | किमान २४.३°C | आर्द्रता ६०%

१५ एप्रिल: कमाल ४२.५°C | किमान २४.१°C | आर्द्रता ५४%

पुढील काही दिवस हा तापमानाचा पारा असाच चढता राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, जळगावकरांना 'मे' हिटचा चटका 'एप्रिल'मध्येच अनुभवायला मिळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news