Jalgaon Crime: साखळी चोरांचा 'डॉन' जेरबंद; सादिक अली उर्फ 'आतंक' अटकेमुळे अनेक जिल्ह्यांतील गुन्ह्यांचा उलगडा होणार

Chain Snatcher caught: राज्याच्या कानाकोपऱ्यात धुमाकूळ घालणारा सादिक अली अखेर जाळ्यात
Jalgaon Crime
Jalgaon Crimepudhari
Published on
Updated on

जळगाव: पुढारी वृत्तसेवा

अनेक जिल्ह्यांमध्ये चैन स्नॅचिंगच्या (साखळी चोरी) गुन्ह्यांनी धुमाकूळ घालणारा आणि पोलिसांना गुंगारा देणारा कुख्यात गुन्हेगार सादिक अली उर्फ 'आतंक' इबादत अली इराणी याच्या मुसक्या आवळण्यात भुसावळ बाजारपेठ पोलिसांना यश आले आहे. 'आतंक' नावाप्रमाणेच दहशत माजवणारा हा गुन्हेगार राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये 'मोस्ट वॉन्टेड' होता, ज्याला भुसावळ बाजार पेठ डी.बी. पथकाने शिताफीने बेड्या ठोकल्या आहेत.

Jalgaon Crime
Jalgaon crime news | भुसावळात 'गावठी कट्टा' नाचवणाऱ्या नाशिकच्या गबरुला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बाजारपेठ पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यात सादिक अली गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता. मात्र, पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून सादिक अलीच्या ठावठिकाण्याबाबत 'पक्की' खबर मिळाली. वेळ न घालवता गुन्हे शोध पथकाने सापळा रचला आणि या साखळी चोरांच्या बादशहाला ताब्यात घेतले.

Jalgaon Crime
वाळूज पोलिसांनी पकडला सराईत गुन्हेगार; मुद्देमाल जप्त

राज्याच्या नकाशावर गुन्ह्यांचा आलेख

तपासादरम्यान समोर आलेली माहिती थक्क करणारी आहे. या आरोपीने केवळ जळगावच नव्हे, तर विदर्भ आणि मराठवाड्यातही आपला हात साफ केला होता. तो या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत हवा होता:

जळगाव जिल्हा: जळगाव तालुका, जिल्हापेठ, चाळीसगाव शहर, चाळीसगाव ग्रामीण.

विदर्भ: वर्धा, बुलढाणा (शेगाव, नांदुरा, खामगाव).

इतर: धुळे आणि संभाजीनगर (औरंगाबाद).

Jalgaon Crime
Jalgaon Crime | दरोड्याच्या तयारीतील टोळीला मध्यरात्री पाठलाग करून पकडले; ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

ही मोठी कारवाई जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. बाजारपेठचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या नेतृत्वाखालील डी.बी. पथकातील विजय नेरकर, कांतीलाल केदारे, प्रशांत सोनार, भूषण चौधरी, योगेश माळी, जावेद शहा, दिलीप कोल्हे, सचिन चौधरी, महेंद्रसिंग पाटील, अमर आढाले, चंद्रकांत रायपूरकर, कोतकर आणि जीवन कपडे यांनी ही मोहीम फत्ते केली.

सादिक अलीच्या अटकेमुळे चैन स्नॅचिंगच्या अनेक गुन्ह्यांची मालिका उघड होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news