Nashik Bribery Case | खाकीला काळिमा! शनिपेठेत लाचेचा 'शनि' नडला; 1 लाखाची लाच घेताना पोलीस नाईक जाळ्यात

Nashik Bribery Case | मुलावरची कारवाई टाळण्यासाठी मागितली होती २ लाखांची खंडणी; जळगाव एसीबीचा 'धडाकेबाज' दणका
Bribery Case
Bribery CasePudhari
Published on
Updated on

जळगाव :
मुलावर कोणतीही कायदेशीर कारवाई न करण्यासाठी दोन लाखांची लाच मागणाऱ्या शनिपेठ पोलीस स्टेशनच्या विनोद पितांबर अहिरे या पोलीस नाईकाला १ लाखाची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असून लाचखोरांचे धाबे दणाणले आहेत.

Bribery Case
Ashok Kharat Case | खरातच्या 'तृप्ताबाला'वर ईडी-आयकरचा छापा

नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील मूळ तक्रारदार हे जळगाव येथील रहिवासी आहेत. त्यांच्या मुलांविरुद्ध शनिपेठ पोलीस स्टेशनमध्ये एक तक्रारीचा अर्ज दाखल होता. या अर्जाची चौकशी पोलीस नाईक विनोद अहिरे यांच्याकडे सुरू होती.

मुलावर कोणतीही कायदेशीर कारवाई न करता तो अर्ज निकाली काढण्यासाठी अहिरे यांनी तक्रारदाराकडे चक्क २ लाख रुपयांची मागणी केली होती. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने १३ एप्रिल २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली.

Bribery Case
Nashik MHADA Scam | म्हाडा घोटाळ्याचा तपास आता 'एसआयटी'कडे! विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम बिल्डर लॉबीचा हिशोब घेणार

तक्रारीची शहानिशा केल्यानंतर तडजोडीअंती १ लाख रुपये देण्याचे ठरले. सोमवारी, १३ रोजी सायंकाळी जळगाव एसीबीच्या पथकाने शनिपेठ पोलीस स्टेशन परिसरात सापळा रचला. लाचेची रक्कम देण्यासाठी तक्रारदार पोलीस स्टेशनवर पोहोचले असता, अहिरे यांनी पोलीस स्टेशनच्या अगदी बाहेरच ही रक्कम स्वीकारली. पैसे स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्यांना झडप घालून ताब्यात घेतले.

ही यशस्वी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी आणि सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सापळा पथकात पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील, संगीता पवार, राकेश दुसाने, सचिन चाटे आणि अमोल सूर्यवंशी यांचा समावेश होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news