Jalgaon Robbery | रावेर पोलिसांचा 'सर्जिकल स्ट्राईक': ८ लाखांच्या लूटमारीतील ७ सराईत जेरबंद; मुख्य सूत्रधार 'हसन फावड्या' अद्याप फरार

६७ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने गुन्हे शोध पथकाची धडाकेबाज कामगिरी
Raver  8 Lakh Robbery case
टोळीच्या मुसक्या आवळण्यात रावेर पोलिसांना मोठे यश Pudhari
Published on
Updated on

Raver 8 Lakh Robbery case

जळगाव: बऱ्हाणपूरच्या मसाला व्यापाऱ्याची गाडी अडवून ८ लाख रुपये लुटणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात रावेर पोलिसांना मोठे यश आले आहे. रावेर गुन्हे शोध पथकाने शिताफीने तपास करत ७ संशयितांना बेड्या ठोकल्या असून, त्यांच्याकडून साडेतीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. मात्र, या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार आणि रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार 'हसन फावड्या' पोलिसांना हुलकावणी देऊन पसार झाला आहे.

नेमकी घटना काय?

बऱ्हाणपूर येथील मसाला व्यापारी दीपक सुरेश धर्मानी यांनी ६ फेब्रुवारी २०२६ रोजी त्यांचे कर्मचारी गौरव वाघ आणि तौफिक तेली यांना वसुलीसाठी सावदा, फैजपूर आणि रावेर परिसरात पाठवले होते. वसुली आटोपून रात्री ९ वाजेच्या सुमारास कर्मचारी परतत असताना खानापूर आरटीओ बॅरेलजवळ ८ ते ९ जणांच्या टोळीने त्यांची दुचाकी अडवली. शस्त्राचा धाक दाखवून या टोळीने पैशांची बॅग हिसकावून पोबारा केला होता. याप्रकरणी ७ फेब्रुवारी रोजी रावेर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Raver  8 Lakh Robbery case
Jalgaon robbery news | जळगावात वाईन शॉप फोडण्याचा प्लॅन फसला; कल्याणचा सराईत 'भामटा' एलसीबीच्या जाळ्यात!

६७ सीसीटीव्ही अन् तांत्रिक तपासाचे जाळे

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांनी तातडीने गुन्हे शोध पथकाला तपासाचे आदेश दिले. घटनास्थळी सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने सुरुवातीला अडचणी आल्या, मात्र पोलिसांनी जिद्द न हारता रावेर, सावदा आणि फैजपूर परिसरातील तब्बल ६७ सीसीटीव्ही फुटेज तपासले. सुरुवातीला संशय वसुली कर्मचाऱ्यांवरही होता, मात्र तांत्रिक तपासातून बाहेरील टोळीचा सहभाग स्पष्ट झाला.

खबऱ्याच्या माहितीने गुन्हेगार जाळ्यात

तपास सुरू असतानाच डॉ. विशाल जयस्वाल यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी सापळा रचून खालील ७ जणांना ताब्यात घेतले:

१. फारुख शेख रईस

२. अत्ताउल्लाह खान दाउद खान ऊर्फ सोनू

३. शेख सईद शेख कादर सुपडू

४. शेख समीर शेख कलीम ऊर्फ विकू

५. राहील खान दाउद खान

६. रहेमान खान अय्युब खान ऊर्फ मुन्या

७. अक्रम खान इस्माईल खान

(सर्व रा. बंडू चौक, रावेर)

पोलिसी खाक्या दाखवताच या सातही जणांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून ९५ हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी आणि २ लाख ५५ हजार रुपये रोख, असा एकूण ३ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Raver  8 Lakh Robbery case
Jalgaon Robbery | जळगाव, मुक्ताईनगरात चोरट्यांचा धुमाकूळ : दोन वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडीत १० लाखांचा मुद्देमाल लंपास

'हसन फावड्या'चा शोध सुरू

या संपूर्ण लुटीचा मास्टरमाईंड शेख हसन शेख अफजल ऊर्फ 'हसन फावड्या' (रा. रुस्तम चौक, रावेर) हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. पोलिसांची चाहूल लागताच तो फरार झाला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.

या पथकाने केली कामगिरी

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी अनिल बडगुजर व अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल, पीएसआय तुषार पाटील, सुनील वंजारी, कल्पेश आमोदकर, श्रीकांत चव्हाण, प्रमोद पाटील, विशाल पाटील, सुकेश तडवी, विकारोद्दीन शेख, अतुल गाडीलोहार आणि गजानन बोने यांच्या पथकाने ही कारवाई केली. सायबर सेलचे गौरव पाटील व मिलिंद जाधव यांनी तांत्रिक तपासात मदत केली.

न्यायालयाने आरोपींना २६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, पुढील तपास पीएसआय तुषार पाटील करत आहेत.

Raver  8 Lakh Robbery case
Jalgaon robbery : हाफ चड्डी गँगची दहशत पुन्हा सक्रिय! चाळीसगाव-कन्नड घाटात डॉक्टरला लुटले

चाळीसगाव चोरीचा छडा; स्थानिक गुन्हे शाखेकडून ८५ हजारांच्या मुद्देमालासह तिघे जेरबंद

श्रीरामपूर आणि सायगव्हाण परिसरातून आरोपींना ठोकल्या बेड्या; चोरीची स्कूटी आणि मोबाईल हस्तगत.

जळगाव : चाळीसगाव शहरातून स्कूटी आणि मोबाईल चोरणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने छडा लावला आहे. श्रीरामपूर आणि सायगव्हाण (ता. कन्नड) परिसरातून तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून ८५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

चाळीसगाव येथील रहिवासी गणेश तानाजी गवळी यांची स्कूटी आणि मोबाईल १२ फेब्रुवारी २०२५ रोजी चोरीला गेला होता. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते.

असा लागला तपासाचा धागा

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय शेखर डोमाळे आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक माहिती व खबऱ्यांच्या आधारे तपासाची चक्रे फिरवली. मुख्य आरोपी मनोज छोटू मोरे (वय १९) हा श्रीरामपूर (जि. अहिल्यानगर) येथे असल्याची पक्की माहिती मिळताच पोलिसांनी तिथे झडप घालून त्याला ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता त्याने आपल्या साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली.

या आरोपींना करण्यात आली अटक:

१) मनोज छोटू मोरे (वय १९, रा. श्रीरामपूर) २) आदित्य बाजीराव वाघ (वय २१, रा. सायगव्हाण, ता. कन्नड) ३) विनोद रामदास सौदाणे (वय १९, रा. सायगव्हाण, ता. कन्नड)

जप्त केलेला मुद्देमाल:

  • चोरीला गेलेली होंडा एव्हीएटर स्कूटी.

  • वन प्लस नॉर्ड (One Plus Nord) मोबाईल.

  • गुन्ह्यासाठी वापरलेली हिरो शाईन दुचाकी (क्र. MH 20 HD 4350).

Raver  8 Lakh Robbery case
Jalgaon Robbery Case : पेट्रोल पंप दरोडा प्रकरणातील सहा जणांना अटक

पुढील कारवाई

अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींची चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर आरोपी आणि जप्त केलेला मुद्देमाल पुढील कायदेशीर कारवाईसाठी चाळीसगाव शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला आहे.

तपास पथकाची कामगिरी

ही यशस्वी कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक शेखर ना. डोमाळे, हवालदार संदीप पाटील, पोलीस नाईक सागर पाटील आणि चालक बाबासाहेब पाटील यांच्या पथकाने पार पाडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news