Jalgaon Robbery | जळगाव, मुक्ताईनगरात चोरट्यांचा धुमाकूळ : दोन वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडीत १० लाखांचा मुद्देमाल लंपास

मनुमाता नगरात ४ लाखांची घरफोडी; मुक्ताईनगरच्या हरताळ्यात दोन घरांचे कुलूप तोडून ६ लाखांचा ऐवज लंपास
10 lakhs theft Jalgaon
Jalgaon Robbery News Pudhari
Published on
Updated on

10 lakhs theft Jalgaon

जळगाव : शहरालगतच्या खेडी शिवार परिसरातील मनुमाता नगरात चोरट्यांनी पुन्हा एकदा पोलिसांना आव्हान देत एका बंद घराचे कुलूप तोडून ४ लाख ६ हजार रुपयांचा ऐवज लांबवला आहे. एका अडत व्यापाऱ्याच्या घरात शिरून चोरट्यांनी लोखंडी कपाटातील रोकड आणि दागिने लंपास केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी संदीप अशोक पाटील (वय ३७, रा. प्लॉट नं. ०९, गट नं. ११, मनुमाता नगर, खेडी शिवार) हे आपल्या व्यवसायानिमित्त बाहेर गेले असताना ही घटना घडली. दि. १४ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ ते दि. १६ फेब्रुवारी दुपारी ३ वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी ही संधी साधली. अज्ञात चोरट्याने घराच्या मुख्य लोखंडी दरवाजाचा कोंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील बेडरूममध्ये असलेल्या गोदरेज कंपनीच्या कपाटाची तिजोरी लबाडीच्या इराद्याने तोडून त्यातील सोन्या-चांदीचे दागिने आणि १ लाख ८० हजार रुपयांची रोकड असा एकूण ४ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

10 lakhs theft Jalgaon
Jalgaon Robbery | जळगावात चोरट्यांचा सुळसुळाट : बंद घर फोडून दागिने लंपास, भररस्त्यात वृद्धेची पोत हिसकावली

रोकडमध्ये ५०० आणि २०० च्या नोटांचा समावेश

चोरट्यांनी लांबवलेल्या १ लाख ८० हजारांच्या रोकडमध्ये ५०० रुपये दराच्या ३०० नोटा आणि २०० रुपये दराच्या १०० नोटांचा समावेश होता. यासोबतच सोन्या-चांदीचे मौल्यवान दागिनेही चोरट्यांनी लंपास केले आहेत. संदीप पाटील यांनी घरी परतल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

पोलीस तपासाचे चक्र वेगात

याप्रकरणी संदीप पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

पुढील तपास एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे हे करत आहेत. भरवस्तीत झालेल्या या धाडसी चोरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.

10 lakhs theft Jalgaon
Jalgaon robbery : हाफ चड्डी गँगची दहशत पुन्हा सक्रिय! चाळीसगाव-कन्नड घाटात डॉक्टरला लुटले

मुक्ताईनगरच्या हरताळ्यात चोरांचा धुमाकूळ; दोन घरांचे कुलूप तोडून ६ लाखांचा ऐवज लंपास

शेतकऱ्यांच्या कष्टाच्या कमाईवर डल्ला; पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान

मुक्ताईनगर : तालुक्यातील हरताळा गावात चोरट्यांनी मध्यरात्री हैदोस घालत दोन बंद घरांचे कुलूप तोडून सुमारे ५ लाख ९१ हजार ६९३ रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले आहेत. एकाच रात्री झालेल्या या धाडसी चोरीमुळे मुक्ताईनगर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, चोरट्यांनी पोलिसांच्या गस्तीला एकप्रकारे आव्हानच दिले आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, हरताळा येथील हनुमान मंदिराच्या मागे राहणारे शेतकरी रवींद्र भगवान चौधरी (वय ५१) आणि त्यांचे शेजारी साक्षीदार रामभाऊ मधुकर पाटील यांची घरे दि. १५ फेब्रुवारीच्या रात्री बंद होती. हीच संधी साधून अज्ञात चोरट्यांनी रात्री ११ ते दि. १६ फेब्रुवारीच्या पहाटे ५.३० वाजेच्या दरम्यान दोन्ही घरांच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे मौल्यवान दागिने असा एकूण ५ लाख ९१ हजार ६९३ रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

10 lakhs theft Jalgaon
Jalgaon Robbery Case : पेट्रोल पंप दरोडा प्रकरणातील सहा जणांना अटक

सकाळी उघडकीस आला प्रकार

सोमवारी सकाळी ५.३० च्या सुमारास घराचे कुलूप तुटलेले दिसताच चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. रवींद्र चौधरी यांनी तात्काळ मुक्ताईनगर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. या चोरीमध्ये सोन्याचे दागिने आणि चांदीच्या वस्तूंचा समावेश असून, सर्व माल चोरट्यांनी अतिशय चलाखीने लांबवला आहे.

गुन्हा दाखल, तपासाचे चक्र फिरले

रवींद्र भगवान चौधरी यांच्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर ४८/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५ (a) आणि ३३१ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप या प्रकरणात कोणालाही अटक झालेली नाही.

घटनेची गांभीर्याने दखल घेत सपोनि राजेंद्र चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्ताईनगर पोलीस पुढील तपास करत आहेत. गावातील सीसीटीव्ही फुटेज आणि संशयितांची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे. मात्र, भरवस्तीत झालेल्या या चोरीमुळे ग्रामस्थांमध्ये पोलिसांच्या सुरक्षेबाबत संताप व्यक्त केला जात आहे.

मुक्ताईनगरच्या 'त्या' सराईत चोरट्याला जळगाव एलसीबीने बेड्या ठोकल्या

जळगाव : खाकीचा धाक विसरून चोरीचा सपाटा लावणाऱ्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात जळगाव स्थानिक गुन्हे शाखा आणि भुसावळ शहर पोलिसांना मोठे यश आले आहे. भुसावळ न्यायालयाच्या आवारातून वकिलाची दुचाकी लंपास करणाऱ्या मुक्ताईनगरच्या किरण उर्फ करण शालीग्राम पाटील या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

३ फेब्रुवारी २०२६ रोजी भुसावळ न्यायालयाच्या आवारातून ॲड. रोकडे यांची दुचाकी (क्रमांक MH-39 T-6102) अज्ञात चोरट्याने लंपास केली होती. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news