Jalgaon robbery news | जळगावात वाईन शॉप फोडण्याचा प्लॅन फसला; कल्याणचा सराईत 'भामटा' एलसीबीच्या जाळ्यात!

जळगावात एकाच रात्री दोन दुकाने फोडणारा सराईत चोरटा १२ तासांत गजाआड; एलसीबीचा धडाकेबाज 'सर्जिकल स्ट्राईक'
Jalgaon robbery news
Jalgaon robbery news
Published on
Updated on

जळगाव : शहरात एकाच रात्री दोन प्रसिद्ध वाईन शॉपचे शटर तोडून लाखोंची रोकड लंपास करणाऱ्या सराईत घरफोडी बहाद्दराच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अवघ्या १२ तासांत मुसक्या आवळल्या आहेत. रामनिवस मंजू गुप्ता (वय ३७, रा. कल्याण, जि. ठाणे) असे या 'एकलकोंड्या' चोरट्याचे नाव असून, त्याच्याकडून चोरीची रोकड आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा ३ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?

१९ फेब्रुवारीच्या रात्री चोरट्याने जळगाव शहरात अक्षरशः धुमाकूळ घातला होता. जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भजे गल्लीतील 'प्रिन्स वाईन शॉप' आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अजिंठा चौफुलीवरील 'राज वाईन शॉप' या दोन्ही ठिकाणचे शटर तोडून चोरट्याने अनुक्रमे २.५० लाख आणि १.२५ लाख रुपयांची रोकड लंपास केली होती. एकाच रात्री दोन दुकाने फुटल्याने व्यापारी वर्गात घबराट पसरली होती.

एलसीबीचा 'स्मार्ट' तपास

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले. एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी तत्काळ पथके तयार केली. तांत्रिक पुरावे आणि 'नेत्रम' विभागाच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाची चक्रे फिरवण्यात आली. अवघ्या १२ तासांच्या आत पथकाने संशयित रामनिवस गुप्ता याला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.

कल्याण ते जळगाव... असा आहे गुन्हेगारी आलेख

पकडलेला आरोपी रामनिवस गुप्ता हा मूळचा उत्तर प्रदेशचा असून सध्या कल्याणमध्ये स्थायिक आहे. विशेष म्हणजे, तो चोरी करताना कोणत्याही साथीदाराची मदत घेत नाही, तर एकटाच चोरी करतो. त्याच्यावर मुंबई, ठाणे, नवी मुंबई, मीरा-भाईंदर आणि पुणे यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये घरफोडीचे तब्बल ७ गंभीर गुन्हे दाखल आहेत. जळगावातही त्याने अशाच पद्धतीने डल्ला मारला होता.

जप्त मुद्देमाल

१) प्रिन्स वाईन शॉपमधील चोरीची रक्कम: १,५८,०००/-

२) राज वाईन्स मधील चोरीची रक्कम: ४६,०००/-

३) गुन्ह्यात वापरलेली बजाज अव्हेंजर बाईक: १,००,०००/-

एकूण जप्त ऐवज: ३,०४,०००/-

यांनी केली कारवाई

ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरीक्षक राहुल गायकवाड, पीएसआय शरद बागल, अतुल वंजारी, विजय पाटील, नितीन बाविस्कर, अक्रम शेख, उमाकांत पाटील, किशोर पाटील, रवींद्र कापडणे, प्रशांत परदेशी आणि मुबारक देशमुख यांच्या पथकाने केली. आरोपीला पुढील तपासासाठी जिल्हापेठ पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news