Jalgaon News : अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी गावकरी सरसावले पुढे

Jalgaon News : अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी गावकरी सरसावले पुढे

जळगाव- चोरट्या वाळू वाहतूक मुळे प्रशासनाचे नुकसान होते व ग्रामस्थांनाही त्रास सहन करावा लागतो. याला थांबवण्यासाठी जळगाव तालुक्यातील दापोरा येथील ग्रामस्थ पुढे सरसावले आहेत. येथील ग्रामस्थ सरपंचासह ग्रामसेवक तलाठी यांच्या उपस्थितीत नदीपात्रात जाणारे सर्व रस्ते खोदून काढले आहेत.

जळगाव जिल्ह्यामध्ये वाळू उपसाला शासनाने परवानगी दिलेली नाही. तरीही गिरणा नदीपात्रातून वाळूचा मोठ्या प्रमाणात उपसा होत आहे. अवैध वाळू व्यवसाय करणारे चोरट्या मार्गाने वाळू उपसाकरीत आहे. सोमवारी धरणगाव तालुक्यातील खेडी येथे मंडळ अधिकारी किरण बावीस्कर, तलाठी बाहरे आप्पा, खेडी तालुका धरण गाव येथील ग्रामस्थ, शेतकरी सरपंच, उप सरपंच, धानोरा सरपंच व पोलीस पाटील यांनी गिरणा नदीपात्रात उतरून अवैध रित्या वाळूचा उपसा करणारे 18 तराफा पकडून काठावर आणून नष्ट केले. तर
दापोरा तालुका जळगाव येथे (दि.) 7 सकाळी अवैध वाळूचा उपसा थांबविण्यासाठी ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थ यांनी नदीपात्रात जाणारे रस्ते खोदले. यावेळी तलाठी मयूर महाले, ग्रामसेवक दिलीप पवार, सरपंच माधवराव गवंदे यांचे सह ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news