Assembly Winter Session: ब्रेकिंग : नवाब मलिक सत्ताधारी बाकावर; अजित पवार गटाला पाठिंबा

Assembly Winter Session: ब्रेकिंग : नवाब मलिक सत्ताधारी बाकावर; अजित पवार गटाला पाठिंबा
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : नागपूर येथे आजपासून (दि.७) विधानसभेच्या हिवाळी अधिवेनाला सुरूवात झाली. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक हे सभागृहात सत्ताधारी पक्षाच्या बाकावर बसलेलेल दिसले. यावरून माजी मंत्री नवाब मलिक यांना अजित पवार गटाला पाठींबा दिल्याचे स्पष्ट झाले आहे. (Assembly Winter Session)

महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक मनी लाँड्रिंग प्रकरणात गेल्या दीड वर्षांहून अधिक काळ अटकेत होते. त्यांनंतर या प्रकरणात त्यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्यानंतर ते आता हळूहळू राजकारणात पुन्हा सक्रिय होताना दिसत आहेत. त्यांच्या सुटकेनंतर ते सभागृहात आज उपस्थित राहण्याची त्यांची ही पहिलीच वेळ आहे. ते २०२२ च्या अधिवेशनात गैरहजर होते. त्यानंतर बऱ्याच प्रतीक्षेनंतर ते विधानसभा सभागृहात हिवाळी अधिवेशनाला उपस्थित राहिले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याने माजी मंत्री नवाब मलिक कोणत्या गटाकडे जाणार याची उत्सुकता होती. आज अधिवेशनादरम्यान सत्ताधाऱ्यांच्या शेवटच्या बाकावर बसत नवाब मलिक यांनी अजित पवार गटाला जाहीर पाठिंबा दिला. Assembly Winter Session)

सुटकेनंतर दोन्ही गटाचे नेते माजी मंत्री मलिक यांच्या भेटीला

मनी लाँडरिंग प्रकरणी मलिक यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) २३ फेब्रुवारी २०२२ रोजी आपल्या कार्यालयातच अटक केली होती. यानंतर एक वर्ष आणि पाच महिन्यानंतर अनुशक्तीनगरचे आमदार असलेले नवाब मलिक यांना १५ ऑगस्ट, २०२३ रोजी जामीन मिळाला. तुरुंगातून सूटका झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांची मिरवणूक काढली होती. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटातील नेत्यांनी नवाब मलिक यांची भेट घेत, त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. सुप्रिया सुळे यांनी नवाब मलिकांची भेट घेतल्यानंतर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही नवाब मलिक यांच्या निवासस्थानी जात भेट घेतली होती. यावेळी अजित पवारांसोबत मंत्री दिलीप वळसे-पाटील आणि हसन मुश्रीफ हेही उपस्थित होते. त्यानंतर नवाब मलिक कोणत्या गटाकडे जाणार याची उत्सुकता होती. आज अधिवेशनाचे निमित्त साधत मलिक यांनी सत्ताधारी अजित पवार गटाच्या बाकावर बसणे पसंत केले आहे.

Assembly Winter Session : पहिल्याच दिवशी विरोधकांचा आक्रमक पवित्रा

राज्यातील अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या मुद्द्यावरून आज अधिवेशन सुरु होण्याआधी विरोधकांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली. विरोधी पक्षातील आमदारांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नी विधानसभा भवनातील पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी विरोधी पक्षांनी मागणीचे फलक, लिंबू, संत्री, कापसाचे बोंडे असलेल्या माळा गळ्यात घालत सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा विरोध केला. विधानभवन परिसरात काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेनेकडून सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला. (Assembly Winter Session)

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news