

जळगाव : जिल्ह्यामध्ये मेच्या शेवटी व जूनच्या पहिल्या दिवशी झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. 283 गावांमधील 5787 शेतकऱ्यांचे 3519.92 हेक्टरमधील केळी, लिंबू, पपई व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. तसेच पारोळा तालुक्यात विज पडून एकाचा मृत्यू तर पाच दुधाळ जनावरे मयत झालेले आहेत.
जळगाव जिल्ह्यात आलेल्या अवकाळी पावसाचा वादळी वाऱ्यामुळे एक जून रोजी पारोळा तालुक्यातील भायडा लाछा पावरा याचा वीज पडून मृत्यू झाला आहे.वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे पाच दुधाळ जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर भडगाव येथे एका बैलाच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाला आहे. तसेच भडगाव रावेर यावल चाळीसगाव चोपडा एरंडोल मुक्ताईनगर बोदवड या ठिकाणी 55 घरांची व एका झोपडीची पडझड झालेली आहे.
30 मे रोजी झालेल्या पावसामुळे यावल तालुक्यात सहा गावे बाधित झाली आहेत. 35 शेतकऱ्यांचे 21 हेक्टरवरील केळी पिकांचे नुकसान झालेले आहे. तर रावेर तालुक्यातील आठ गावांमधील 44 शेतकऱ्यांचे 32.90 हेक्टर वरील पिकांचे नुकसान झालेले असून एकूण 14 गावांतील 9 शेतकऱ्यांचे 53.90 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेले आहे.
जळगाव तालुक्यातील तीन गावे बाधित झाल्याने आठ शेतकऱ्यांचे 2. 50 हेक्टरवरील केळी पिकांचे नुकसान झाले आहे. यावर तालुक्यातील सात गावांमध्ये 10 शेतकऱ्यांचे तीन हेक्टरवरील केडी पिकांचे मोठे नुकसान झाले. मुक्ताईनगर तालुक्यातील सोडा गावांमधील 330 शेतकऱ्यांचे 262.70 हेक्टरी पिकांचे नुकसान झाले आहे. चोपडा गावातील 18 बाधित गावामधील 85 शेतकऱ्यांचे 35.80 हेक्टर वरील केळी पिकांचे नुकसान झाले. पारोळा तालुक्यातील दोन गावांमधील 17 शेतकऱ्यांचे 5. 40 इतर पिकांचे नुकसान झाले. चाळीसगाव तालुक्यासह गावांमधील 27 शेतकऱ्यांचे पंधरा हेक्टरवरील केडीचे व एक हेक्टरील लिंबूचे असे सोडा हेक्टरी पिकांचे नुकसान झाले.
जामनेर तालुक्यातील ताज गावांमधील 42 शेतकऱ्यांचे १३.५० हेक्टरवरील केळी व पपई असे 14.50 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. पाचोरा येथील तीन गावांमधील २१ शेतकऱ्यांचे आठ हेक्टरी नुकसान झालेलं आहे. भडगावमधील 18 गावांचे 1246 शेतकऱ्यांचे 361 हेक्टरवरील केळी, 215 हेक्टरवरील लिंबू व दोन हेक्टर वरील इतर पिकांचे नुकसान झालेले. 31 मे रोजी 83 गावांमधील 1786 बाधित शेतकऱ्यांचे 701.50 केळी, 218 लिंबू,एक हेक्टरी पिंपळी व 7 हेक्टर वरील इतर पिकांचे असे एकूण 925.90 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले.
एक जून रोजी भुसावळ तालुक्यातील 15 गावांमधील 102 शेतकऱ्यांचे 84.50 हेक्टरवरील केळी पिकांचे नुकसान झाले आहे. यावल तालुक्यातील सोडा गावांमधील 53 शेतकऱ्यांचे 32.62 हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले आहे. रावेर तालुक्यातील 87 गावांचे 2114 शेतकऱ्यांचे १५३५.५० हेक्टर वरील केळी पिकाचे नुकसान झाले आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील 20 गावांमधील1077 शेतकऱ्यांचे 638 हेक्टरवरील केळी पिकांचे नुकसान झाले आहे.
पारोळा तालुक्यातील 14 गावांमधील 239 शेतकऱ्यांचे 21.40 हेक्टर वरील केळी, 53.70 हेक्टरवरील लिंबू, चार हेक्टर वरील पपई आणि दोन हेक्टर वरील इतर पिकांचे नुकसान झाले आहे. पाचोरा तालुक्यातील तेरा गावांमधील 98 शेतकऱ्यांचे 6 हेक्टरवरील केळीचे नुकसान झाले आहे.
भडगाव तालुक्यातील 21 गावांमधील 218 शेतकऱ्यांचे 87 हेक्टर वरील केळी पीक, 16050 हेक्टर वरील लिंबू,2.40 हेक्टर वरील पपई, 4 हेक्टर वरील मोसंबी आणि 5.50 वरील इतर पिकांचे नुकसान झालेले आहे. असे एकूण एक जून रोजी जळगाव जिल्ह्यातील 180 गावांमधील 3922 शेतकऱ्यांचे 2455.04 हेक्टर वरील (केळी), 70.2 हेक्टर वरील लिंबू,6.40 हेक्टर वरील पपई, 4 हेक्टर वरील मोसंबी आणि 4.5 वरील इतर पिके नुकसानग्रस्त झाले आहेत. अशा प्रकारे एकूण 2540.12 हेक्टर वरील पिकांचे नुकसान झालेले आहे.