Unseasonal Rain : केज, शिरूर, पाटोदा तालुक्यांत अवकाळी

झाड अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू; फळबागांचे मोठे नुकसान
Unseasonal Rain
Unseasonal Rain : केज, शिरूर, पाटोदा तालुक्यांत अवकाळीfile photo
Published on
Updated on

Unseasonal Rain in Kage, Shirur, Patoda talukas

पुढारी वृत्तसेवा : केज, शिरुर व पाटोदा तालुक्याच्या काही भागात शनिवारी रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. यामुळे फ ळबागांचे मोठे नुकसान झाले. तर केज तालुक्यात सोनिजवळा येथे शेतात काम करत असलेल्या शेतकऱ्याचा झाड अंगावर पडल्याने मृत्यू झाला. याबरोबरच पाटोदा आणि शिरुर तालुक्यातही अनेक घरांवरील पत्रे उडाल्याने नुकसान झाले.

Unseasonal Rain
Beed news | बीडमध्ये अस्मानी संकट! अवकाळी पाऊस अन् वादळी वाऱ्यासह वीज कोसळली; झाडाखाली आसरा घेतलेल्या एकाचा दुर्दैवी मृत्यू

केज तालुक्यात शनिवारी सायंकाळी ६:४५ च्या सुमारास प्रचंड उकाड्या नंतर अचानक कळ्या ढगांनी आभाळ भरून आले आणि त्या नंतर सोसायट्याचा वारा आणि विजेच्या कडकडाटासह युसुफवडगाव महसूल मंडळातील युसुफवडगाव सह सोनिजवळा, धनेगाव, भालगाव, बावची, साळेगाव, माळेगांव, सुर्डी, सोनेसांगवी, सुकळी, गोटेगाव, मोटेगाव, बोबडेवाडी परिसराला अवकाळी पावसाने झोडपून काढले.

सोनिजवळा येथे शेतात काम करीत असलेले ५० वर्ष वयाचे दिगंबर ससाणे हे आंब्याच्या झाडाच्या निवाऱ्याला उभे राहिले असताना आंब्याच्या झाडावर वीज कोसळून ते झाड उन्मळून पडल्याने झाडाखाली दाबून दिगंबर भीमराव ससाणे यांचा जागीच गतप्राण झाले. तर नियतीचा खेळ इथेचप संपता दिगंबर ससाणे यांच्या घरा समोर असलेले चिंचेचे झाड देखील उन्मळून पडले. तसेच धनेगाव येथे एका उभ्या कारवर झाड पडल्याने कारचे मोठे नुकसान झाले आहे.

Unseasonal Rain
Kej Storm damage | केज तालुक्यात अवकाळी पाऊस आणि वादळाचा हाहाकार : पपई - केळीच्या बागा भुईसपाट !

अनेक ठिकाणी विजेचे खांब व रोहित्र याचे खांब पडल्याने नुकसान झाले असून काढणीला आंब्याचा वादळामुळे खच पडला आहे. तालुक्यातील अनेक गावात अनेकांच्या घरांचे पत्रे देखील उडून गेले आहेत.

दरम्यान प्रभारी तहसीलदार अशोक भंडारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तालुक्यातील ग्राममहसूल अधिकाऱ्यांना नुकसानीची माहिती घेऊन अहवाल सादर करण्याचे तोंडी आदेश दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news