Raigad Unseasonal Rain | रायगड जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा; तळा तालुक्यात वीज पडून मुलाचा मृत्यू

विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत
Wardha lightning strike |
Wardha lightning strike: जैतापूर येथे वीज कोसळून २९ शेळ्यांचा मृत्यू File Photo
Published on
Updated on

Tala Taluka Lightning Strike Death

अलिबाग : रायगड जिल्ह्यात शनिवारी (दि.९) अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत अनेक तालुक्यांना झोडपून काढले. विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, अनेक ठिकाणी झाडे कोसळणे, वीजपुरवठा खंडित होणे आणि घरांचे नुकसान होण्याच्या घटना घडल्या. तळा तालुक्यात वीज कोसळून १४ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

महाड, माणगाव, रोहा, पोलादपूर, सुधागड, पेण आणि खालापूर तालुक्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. अनेक भागांत धुळीचे प्रचंड लोट उठल्याने दुपारच्या वेळीच वातावरण धुरकट झाले होते. त्यामुळे वाहनचालकांना रस्त्यावरून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागली, तर नागरिकांचीही एकच तारांबळ उडाली.

रोहा शहरात तुफानी वाऱ्यामुळे काही घरांवरील पत्रे उडून गेली. तसेच अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्याने वाहतुकीवर परिणाम झाला.

Wardha lightning strike |
Raigad Robbery | मित्रानेच रचला ५७ तोळे सोन्याच्या दागिन्यांच्या लुटीचा कट...!

पाली-सुधागड परिसरात दुपारनंतर अचानक वातावरण बदलले आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पाली शहरासह ग्रामीण भागात पावसाचा जोर अधिक होता. बाजारपेठांमध्ये नागरिकांची धावपळ उडाली असून, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. काही घरांचे नुकसान झाले असून, विजेचे खांब उन्मळून पडल्याने वीजपुरवठाही खंडित झाला.

खालापूर तालुक्यात मुसळधार पावसाबरोबरच काही ठिकाणी किरकोळ गारपीटही झाली. वादळी वाऱ्यामुळे अनेक झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या असून काही भागांतील वीजपुरवठा विस्कळीत झाला आहे.

तळा तालुक्यातील कर्नाळा फलशेत गावात अंगावर वीज पडून वेदांत भोसले (वय १४) या मुलाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Wardha lightning strike |
Raigad crop damage: आंबा-काजू बागायतदारांच्या मदतवाटपात दिरंगाई; रोहयो मंत्री भरत गोगावले संतप्त

दरम्यान, जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, हवामान विभागाने पुढील काही तासांतही काही भागांत पावसाची शक्यता वर्तवली आहे.

logo
Pudhari News
pudhari.news