Jalgaon news: रस्त्यावर HSRPचा दंड; RTOच्या आवारात मात्र नियमांना बगल?

जळगाव RTOतील टेस्ट ड्राइव्ह वाहनांच्या नंबर प्लेटवरून प्रश्न; अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर कारवाईचा इशारा
Jalgaon news: रस्त्यावर HSRPचा दंड; RTOच्या आवारात मात्र नियमांना बगल?
Published on
Updated on

जळगाव : वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी अर्थात HSRP नंबर प्लेट अनिवार्य करण्यासाठी मोटार वाहन विभागाकडून सातत्याने जनजागृती आणि कारवाई केली जात असताना, जळगाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारातच या नियमाच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे चित्र समोर आले आहे. RTO कार्यालयात ड्रायव्हिंग टेस्टसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांपैकी एका वाहनाच्या नंबर प्लेटबाबत आक्षेप घेण्यात आला आहे. या वाहनावर आवश्यक HSRP स्वरूपाची नंबर प्लेट नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Jalgaon news: रस्त्यावर HSRPचा दंड; RTOच्या आवारात मात्र नियमांना बगल?
Jalgaon News : भूमिपूजनाचा फुसका बार की भुसावळकरांच्या जखमेवर मीठ? अमृत-१ चे काम अधूनच, तरीही अमृत-२ ची कुदळ मारली

रस्त्यावर HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर कारवाई केली जाते. मात्र, RTO कार्यालयाच्या परिसरातच ड्रायव्हिंग टेस्टसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनाच्या नंबर प्लेटबाबत नियमांचे पालन होत नसेल, तर सर्वसामान्य वाहनधारकांसाठी एक नियम आणि कार्यालयीन परिसरातील वाहनांसाठी दुसरा नियम आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.

Jalgaon news: रस्त्यावर HSRPचा दंड; RTOच्या आवारात मात्र नियमांना बगल?
Jalgaon News | जळगावच्या बळीराजाला दिलासा! ‘अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती’तून ३१,९०८ शेतकऱ्यांच्या खात्यावर तब्बल १८४ कोटी वर्ग!

पांढऱ्या प्लेटवर पिवळा रंग?

संबंधित वाहनाच्या नंबर प्लेटवर पांढऱ्या प्लेटवर पिवळ्या रंगाचा थर अथवा पिवळा रंग करण्यात आल्याचे दिसून येत असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे ही नंबर प्लेट अधिकृत HSRP आहे का, तिच्यावर आवश्यक सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत का आणि ती वाहनाच्या नोंदणीच्या प्रकारानुसार नियमानुसार आहे का, याची तपासणी होणे आवश्यक आहे. HSRP प्रणालीचा उद्देश वाहनांची अधिकृत ओळख निश्चित करणे, नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटपणाला आळा घालणे आणि वाहनांच्या सुरक्षिततेला बळ देणे हा आहे. त्यामुळे संबंधित वाहनाची नंबर प्लेट नियमांनुसार आहे की नाही, याबाबत RTO प्रशासनाने स्पष्टता देणे अपेक्षित आहे.

Jalgaon news: रस्त्यावर HSRPचा दंड; RTOच्या आवारात मात्र नियमांना बगल?
Jalgaon News | समांतर रस्ता अतिक्रमणांच्या विळख्यात; कोट्यवधींचा प्रकल्प ठप्प, वाहतूक कोंडीने जळगावकर हैराण

‘RTOमध्ये नियम वेगळे आहेत का?’

सामान्य वाहनचालकाच्या वाहनावर HSRP नंबर प्लेट नसल्यास रस्त्यावर कारवाई केली जाते. मग RTO कार्यालयाच्या परिसरात, त्याच विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर ड्रायव्हिंग टेस्टसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनाच्या नंबर प्लेटबाबत नियमांची अंमलबजावणी का होत नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ड्रायव्हिंग टेस्टसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनाची कागदपत्रे, नोंदणी, विमा, परवाना तसेच वाहन नियमांनुसार आहे की नाही, याची खातरजमा संबंधित यंत्रणेकडून होणे अपेक्षित आहे. त्यामुळे टेस्ट ड्राइव्हच्या वाहनावरच नियमांचे पालन होत नसेल तर सामान्य नागरिकांकडून नियमपालनाची अपेक्षा कशी करणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Jalgaon news: रस्त्यावर HSRPचा दंड; RTOच्या आवारात मात्र नियमांना बगल?
Jalgaon news: जळगावात कोट्यवधींचा बायपास पहिल्याच पावसात खचला; NHAI अन् ठेकेदाराचे पितळ उघडे

एजंटांच्या अधिकृततेचाही प्रश्न

याचबरोबर RTO कार्यालय परिसरात नागरिकांची कामे करून देणाऱ्या एजंटांच्या अधिकृततेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. संबंधित एजंटांकडे विभागाची अधिकृत परवानगी आहे का? त्यांच्याकडे आवश्यक लायसन्स किंवा अधिकृतता आहे का? वाहनांची कागदपत्रे अथवा RTOशी संबंधित प्रक्रिया त्यांच्या माध्यमातून केली जात असल्यास त्यासाठीची अधिकृत व्यवस्था काय आहे, याबाबतही प्रशासनाने स्पष्टता देण्याची मागणी होत आहे.

Jalgaon news: रस्त्यावर HSRPचा दंड; RTOच्या आवारात मात्र नियमांना बगल?
Jalgaon Chemical Leak News : कंटेनर पलटल्याने ज्वलनशील व विषारी रसायनाची गळती; प्रशासन सतर्क

अधिकाऱ्यांनी घेतली दखल

या प्रकरणाबाबत RTO प्रशासनाचे लक्ष वेधल्यानंतर संबंधित मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या संचालकाला बोलावून नंबर प्लेटबाबत जाब विचारण्यात आला. RTO अधिकारी सचिन बरुड यांच्याशी संपर्क साधून याबाबत विचारणा केली असता, त्यांनी संबंधित मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या संचालकाला बोलावून घेतले. वाहनावर लवकरात लवकर नियमानुसार नंबर प्लेट बसविण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, त्याचे पालन न झाल्यास कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या प्रकारामुळे HSRPच्या नियमांच्या समान अंमलबजावणीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. रस्त्यावर सर्वसामान्य वाहनधारकांकडून नियमांचे काटेकोर पालन अपेक्षित असताना, RTO कार्यालयाच्या परिसरातील टेस्ट ड्राइव्ह वाहनांबाबतही तेवढीच काटेकोरता दाखविणे आवश्यक असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news