Jalgaon Chemical Leak News : कंटेनर पलटल्याने ज्वलनशील व विषारी रसायनाची गळती; प्रशासन सतर्क

रसायनाची गळती पूर्णपणे रोखण्याचे आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम युद्धपातळीवर सुरू
 Jalgaon Container Overturns
सायनाने भरलेला कंटेनर राष्ट्रीय महामार्गावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने पलटी झाला. Pudhari
Published on
Updated on

Jalgaon Container Overturns

जळगाव : गुजरातमधून नागपूरकडे जाणारा रसायनाने भरलेला कंटेनर राष्ट्रीय महामार्गावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने पलटी झाला. या अपघातात कंटेनरमधील ऑर्थो-नायट्रोटोल्युईन (Ortho-Nitrotoluene) या ज्वलनशील व विषारी रसायनाची गळती झाल्याने परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस, रुग्णवाहिका आणि क्रेन घटनास्थळी दाखल झाले. गळती रोखण्यासाठी आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी संबंधित यंत्रणांनी तातडीने उपाययोजना सुरू केल्या असून, परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

 Jalgaon Container Overturns
Gutkha seized jalgaon : मुक्ताईनगरात ८.२० लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; इनोव्हा वाहनासह मोबाईल जप्त, आरोपी फरार

अपघातग्रस्त कंटेनर (क्र. GJ-06-BT-8845) हा महामार्गाच्या खाली उतरल्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू असून, वाहतूक वळविण्याची गरज भासलेली नाही.

ऑर्थो-नायट्रोटोल्युईन म्हणजे काय?

ऑर्थो-नायट्रोटोल्युईन हे ज्वलनशील आणि विषारी औद्योगिक रसायन असून त्याचा वापर प्रामुख्याने रंगद्रव्ये (डाई), रबर उद्योगातील रसायने, कृषी रसायने तसेच औषधनिर्मितीसाठी कच्चा माल म्हणून केला जातो.

 Jalgaon Container Overturns
Jalgaon sand mafia news: लिलाव फ्लॉप, माफिया टॉप! वैध वाळू विक्रीतून जेमतेम ४ कोटी, तर दंडात्मक कारवाईतून तब्बल ९ कोटींची वसुली; जळगावात वाळू माफियांची चांदी

या रसायनाच्या संपर्कात आल्यास त्वचा, डोळे आणि श्वसनसंस्थेवर दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे गळती झालेल्या परिसरापासून सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन प्रशासनाने नागरिकांना केले आहे.

सध्या संबंधित यंत्रणांकडून रसायनाची गळती पूर्णपणे रोखण्याचे आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news