हतनूर धरणात जलसंकट! गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणीसाठा कमालीचा घटला; 'या' शहरांवर टंचाईचे सावट

पाऊस लांबल्यास शेतीसह उद्योग आणि पिण्याच्या पाण्याचे संकट गडद होण्याची चिन्हे
Hatnur Dam
Hatnur Damfile photo
Published on
Updated on

जळगाव : जिल्हावासीयांची तहान भागवणाऱ्या तापी खोऱ्यातील हतनूर धरणातून एक अत्यंत चिंताजनक बातमी समोर येत आहे. जूनचा दुसरा आठवडा सुरू झाला तरी वरुणराजाने पाठ फिरवल्यामुळे हतनूर धरणातील पाणीसाठा कमालीचा खालावला आहे.

आज, ११ जून रोजी समोर आलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, धरणात यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ३७.८% पाणीसाठा कमी झाला आहे. पाऊस आणखी काही दिवस लांबल्यास भुसावळ, वरणगाव, यावल या शहरांसह रेल्वे आणि दीपनगर थर्मल पॉवर स्टेशनला होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर याचा गंभीर परिणाम होण्याची भीती वर्तवली जात आहे.

Hatnur Dam
jalgaon hatnur dam: जळगावकरांनो पाणी जपून वापरा! हातनूर धरणातील साठा घटला; केवळ ३०.८२ टक्केच शिल्लक

११ जूनची स्थिती

धरणाच्या पाणी पातळीत आणि एकूण साठ्यात गतवर्षाच्या तुलनेत झालेली घट खालीलप्रमाणे आहे.

तपशील

पाणी पातळी (मी.)

२०९.७५० मीटर. यंदाची स्थिती (२०२६)

२१२.६० मीटर गतवर्षीची स्थिती (२०२५)

थेट फरक - २.८५ मीटरने कमी.

उपयुक्त पाणीसाठा (%)

२१.१८%. यंदाची स्थिती 2026

५८.९८%गतवर्षीची स्थिती २०२५)

थेट फरक - ३७.८% ने घट

Hatnur Dam
Kolhapur News : पातळी घटली; चिंता वाढली

हतनूर धरणातील पाणी केवळ शेतीसाठीच नाही, तर जळगाव जिल्ह्यातील अनेक महत्त्वाच्या औद्योगिक आणि नागरी संस्थांसाठी जीवनवाहिनी आहे. धरणाची ही खालावलेली पातळी खालील घटकांचे टेन्शन वाढवणारी आहे:

  • नागरी पाणीपुरवठा: भुसावळ शहर, वरणगाव आणि यावल परिसरातील नगरपालिका व नगरपरिषदांची नळ पाणीपुरवठा योजना पूर्णपणे हतनूरवर अवलंबून आहे.

  • रेल्वे आणि संरक्षण क्षेत्र: भुसावळ रेल्वे जंक्शन आणि वरणगावची आयुध निर्माणी (ऑर्डनन्स फॅक्टरी) यांना लागणारा दैनंदिन पाणीपुरवठा येथूनच होतो.

  • ऊर्जा आणि उद्योग: दीपनगर औष्णिक वीज केंद्र (थर्मल पॉवर स्टेशन) आणि भुसावळ-वरणगाव परिसरातील एमआयडीसी (MIDC) मधील उद्योगांना हतनूरमधूनच पाणी दिले जाते.

  • शेतकरी वर्ग: यावल, भुसावळ आणि रावेर पट्ट्यातील केळी उत्पादक व इतर पिकांची शेती या धरणाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे.

Hatnur Dam
Kolhapur drought news | कोल्हापूर जिल्ह्याला टंचाईच्या झळा; पंचगंगेची पातळीही खालावली

गेल्या वर्षी जून महिन्यात हतनूर धरणात तब्बल ५८.९८% पाणीसाठा असल्याने जिल्हा सुखावला होता. मात्र, यंदा हा साठा अवघा २१.१८ टक्क्यांवर आल्याने प्रशासनाला आतापासूनच पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. आता सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या असून, तापी खोऱ्यात दमदार पाऊस होणे हाच एकमेव पर्याय उरला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news