

जळगाव : जिल्ह्यात सोन्या-चांदीच्या दरांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. 23 व 24 डिसेंबर दरम्यान चांदीच्या दरात थेट 11 हजार रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे. याच काळात 22 कॅरेट सोन्याच्या दरात 630 रुपये तर 24 कॅरेट सोन्याच्या दरात 700 रुपयांची वाढ झाली आहे.
नाताळच्या एक दिवस आधीच चांदीच्या दरात मोठी उसळी दिसून आली असून, सोन्या-चांदीचे दरही 600 ते 700 रुपयांनी वाढले आहेत. सध्या लग्नसराईचे दिवस सुरू असले तरी सोन्या-चांदीचे दर केव्हाच लाखांचा टप्पा पार केल्याने सर्वसामान्य ग्राहकांच्या नियोजित खरेदीवर मर्यादा येत असल्याचे चित्र आहे.
सध्याचे दर (प्रति 10 ग्रॅम / प्रति किलो):
22 कॅरेट सोने
पूर्वी: 1,24,570 रुपये
आता: 1,25,200 रुपये
वाढ: 630 रुपये
24 कॅरेट सोने
पूर्वी: 1,36,000 रुपये
आता: 1,36,700 रुपये
वाढ: 700 रुपये
चांदी (प्रति किलो)
पूर्वी: 2,10,000 रुपये
आता: 2,21,000 रुपये
वाढ: 11,000 रुपये
दरवाढीमुळे सराफा बाजारात खरेदीवर परिणाम होत असून पुढील काही दिवसांत दर स्थिर होतील की आणखी वाढतील, याकडे ग्राहकांचे लक्ष लागून आहे.