Gold Price Hike | सलग तिसऱ्या दिवशी सोने दरवाढ: अवघ्या ४८ तासांत तोळ्यामागे ११ हजारांची उसळी; लग्नसराईत सामान्यांचे कंबरडे मोडले

चांदीनेही ३ लाख २३ हजारांवर मजल मारल्याने सर्वसामान्यांचे डोळे पांढरे
Gold Silver price
Gold Silver price Pudhari File Photo
Published on
Updated on

Gold Rate Today Jalgaon

जळगाव : आधीच महागाईच्या चटक्यांनी होरपळणाऱ्या जळगावकरांना आता सोन्या-चांदीनेही जोरदार 'शॉक' दिला आहे. सुवर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावच्या सराफ बाजारात बुधवारी (दि. २१) सोन्याने ऐतिहासिक झेप घेत थेट १ लाख ५५ हजारांचा टप्पा गाठला आहे. तर चांदीनेही ३ लाख २३ हजारांवर मजल मारल्याने सर्वसामान्यांचे डोळे पांढरे झाले आहेत. गेल्या तीन दिवसांत सोन्या-चांदीच्या दरात झालेली ही प्रचंड वाढ ग्राहकांच्या काळजाचा ठोका चुकवणारी ठरली आहे.

जागतिक घडामोडी आणि लग्नसराईच्या तोंडावर वाढलेली मागणी यामुळे सराफ बाजारात तेजीचे वादळ आले आहे. १९ जानेवारीला १ लाख ४४ हजारांवर असलेले २४ कॅरेट सोने आज (२१ जानेवारी) थेट १ लाख ५५ हजारांवर पोहोचले आहे. म्हणजेच अवघ्या दोन दिवसांत तोळ्यामागे तब्बल ११ हजार रुपयांची वाढ झाली आहे. दुसरीकडे, चांदीनेही एकाच दिवसात १० हजार रुपयांची उडी मारत ३ लाखांचा टप्पा केव्हाच ओलांडला आहे.

Gold Silver price
Silver Gold Rate | चांदी ३ लाखांच्या पार! जीएसटीच्या 'तडक्या'ने सोनेही दीड लाखाच्या उंबरठ्यावर

या अवाढव्य दरवाढीमुळे मध्यमवर्गीय आणि नोकरदार वर्गाचे बजेट कोलमडले असून, लग्नासाठी दागिने घ्यायचे की फक्त पाहायचे? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

असा चढला दरांचा आलेख (गेल्या ३ दिवसांतील स्थिती) तारीख

सोने (२२ कॅरेट)

१९ जानेवारी २०२६. १,३१,९००

२० जानेवारी २०२६ १,३४,१९५

२१ जानेवारी २०२६. १,४१,९८०

सोने (२४ कॅरेट)

१९ जानेवारी २०२६. १,४४,०००

२० जानेवारी २०२६ १,४६,५००

२१ जानेवारी २०२६ १,५५,०००

Gold Silver price
Gold-Silver Rate: सोनं पुन्हा महाग होणार! MCX वर नवा उच्चांक… चांदीचं काय होणार? जाणून घ्या तज्ज्ञांचा अंदाज

चांदी (प्रतिकिलो)

१९ जानेवारी २०२६ २,९७,०००

२० जानेवारी २०२६. ३,१३,०००

२१ जानेवारी २०२६. ३,२३,०००

जळगावच्या सराफ बाजारात दरांचे फलक पाहून ग्राहकांची पावले थबकल्या सारखे चित्र होते. १९ तारखेला चांदी ३ लाखांच्या आत होती, ती आज ३.२३ लाखांवर गेल्याने गुंतवणूकदारांची चांदी झाली असली तरी, सामान्य ग्राहकांच्या खिशाला मात्र मोठी कात्री लागली आहे.

Gold Silver price
Jalgaon Gold Silver Rate : जळगावात सोन्याची शंभरी पार, चांदीने गाठली दोन लाखांनी महागली

लग्नसराई हा सराफ बाजारातील मोठा उलाढालाच काळ असतो. मात्र दर गगनाला भिडत असल्याने दिवसानं दिवस वाढतच असल्याने नवरी कडच्या दागिन्यांची संख्या संख्या कमी झालेली दिसून येणार आहे वाढते दर त्यामुळे नवरीच्या वडिलांच्या खिशाला लागलेली कैची या सगळ्यांचा ताळमेळ बसवणे कठीण झाले आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news