

Silver Gold Price Today Jalgaon
जळगाव : आधीच सोन्या-चांदीच्या वाढत्या दरांनी धाकधूक वाढवली असताना, आता जीएसटीचा (GST) 'तडका' लागल्याने भावाचा अक्षरश: भडका उडाला आहे. ३ टक्के जीएसटीसह जळगावच्या सराफ बाजारात चांदीने आज (दि. १९) थेट ३ लाखांचा (३,०५,९१० रु.) विक्रमी टप्पा ओलांडला आहे. तर २४ कॅरेट शुद्ध सोनेही १ लाख ४८ हजारांच्या घरात पोहोचल्याने सर्वसामान्यांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे.
जळगावच्या सुवर्णबाजारात सोमवारी (दि. १९) उघडलेल्या दरांनी ग्राहकांना जोरदार धक्का दिला. मूळ दरात ३ टक्के जीएसटीची भर पडल्याने दागिने खरेदी करणे आता आवाक्याबाहेर जाऊ लागले आहे. १५ तारखेला जीएसटीसह २ लाख ८६ हजारांवर असलेली चांदी अवघ्या चार दिवसांत जीएसटीसह ३ लाख ५ हजारांवर पोहोचली आहे. म्हणजेच एका किलोमागे ग्राहकांना थेट १९ ते २० हजार रुपये जादा मोजावे लागत आहेत.
असे आहेत जीएसटीसह (३%) आजचे दर (दि. १९ जाने.) :
केवळ सोन्याचे बिस्किट किंवा लगड घ्यायची झाल्यास ग्राहकांना खालीलप्रमाणे किंमत मोजावी लागेल:
चांदी (१ किलो): मूळ भाव २,९७,००० + ८,९१० (GST) = ३,०५,९१० रुपये.
२४ कॅरेट सोने (१० ग्रॅम): मूळ भाव १,४४,००० + ४,३२० (GST) = १,४८,३२० रुपये.
२२ कॅरेट सोने (१० ग्रॅम): मूळ भाव १,३१,९०० + ३,९५७ (GST) = १,३५,८५७ रुपये.
२२ कॅरेट सोने (GST सह)
१५ जाने. १,३३,२२०/-
१७ जाने.१,३३,५९१/-
१९ जाने.१,३५,८५७/-
२४ कॅरेट सोने (GST सह)
१५ जाने.१,४५,४३६/-
१७ जाने १,४५,८४८/-
१९ जाने.१,४८,३२०/-
चांदी (GST सह)
१५ जाने.२,८६,३४०/-
१७ जाने२,९३,५५०/-
१९ जाने.३,०५,९१०/-
जी एस टी व्यतिरिक्त रेट
15th January 2026*
Gold rate
22k 129340
24k 141200
Silver 278000
17th January 2026*
Gold rate
22k 129700
24k 141600
Silver 285000
19th January 2026*
Gold rate
22k 131900
24k 144000
Silver 297000