Jalgaon Gold Silver Rate : जळगावात सोन्याची शंभरी पार, चांदीने गाठली दोन लाखांनी महागली

दोन महिन्यांत सोन्या-चांदीच्या दरात ऐतिहासिक उसळी
Gold-Silver
Gold-SilverNashik Latest News
Published on
Updated on

जळगाव: ऐतिहासिक सुवर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावच्या सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दरांनी सर्व जुने विक्रम मोडीत काढले आहेत. दिवाळीनंतर अवघ्या दोन महिन्यांत सोन्याने ‘धडाका’ दिला असून चांदीने तर ‘भडका’ उडवला आहे.

जळगावच्या सराफ बाजारात सलग दुसऱ्या दिवशी चांदीच्या दरात विक्रमी वाढ नोंदवण्यात आली. एका दिवसात चांदीच्या दरात ५ हजार रुपये, तर त्याआधी २ हजार ७०० रुपयांची वाढ झाली. सध्या जीएसटीसह सोन्याचा दर १ लाख ४० हजार ८० रुपये, तर चांदीचा दर जीएसटीसह २ लाख १६ हजार ३०० रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला आहे.

२२ ऑक्टोबर रोजी दिवाळीपासून ते २३ डिसेंबरपर्यंतच्या कालावधीत सोन्याच्या दरात प्रति १० तोळ्यांमागे सुमारे ११,५०० रुपयांची वाढ झाली आहे. त्याच काळात चांदीच्या दरात प्रति किलो तब्बल ५० हजार रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

Gold-Silver
Silver Price in 2025 : चंदेरी वादळ ! गुंतवणूकदारांसाठी सोन्यापेक्षा अधिक फायदेशीर ठरली चांदी

दिवाळीच्या काळात २४ कॅरेट सोन्याचा दर १,२४,५०० रुपये होता. तो आता १,३६,००० रुपयांवर पोहोचला आहे. सोन्याच्या तुलनेत चांदीतील दरवाढ अधिक लक्षवेधी ठरली आहे. दिवाळीत १,६०,००० रुपये प्रति किलो असलेली चांदी आता २,१०,००० रुपयांच्या ऐतिहासिक टप्प्यावर पोहोचली आहे.

Gold-Silver
Silver Price Hits Record High : चांदीच्या दरात पुन्हा 14 हजारांनी वाढ

दरातील तफावत एका नजरेत

२२ ऑक्टोबर (दिवाळीमध्ये):

  • २२ कॅरेट सोने (१० ग्रॅम): १,१४,०००

  • २४ कॅरेट सोने (१० ग्रॅम): १,२४,५००

चांदी (१ किलो): १,६०,०००

२३ डिसेंबर २०२५ रोजी

  • २२ कॅरेट सोने (१० ग्रॅम): १,२४,५७०

  • २४ कॅरेट सोने (१० ग्रॅम): १,३६,०००

चांदी (१ किलो): २,१०,०००

एकूण वाढ:

  • २२ कॅरेट सोने (१० ग्रॅम): + १०,५७०

  • २४ कॅरेट सोने (१० ग्रॅम): + ११,५००

  • चांदी (१ किलो): + ५०,०००

Gold-Silver
Golden City Jalgaon: दिवसाला अंदाजे 100 किलो सोने विक्री होते तो सराफा बाजार जळगावात कधी सुरू झाला?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news