Jalgaon cyber crime : टूर अँड ट्रॅव्हल्सच्या नावाखाली २.१५ कोटींचे सायबर राकेट; मुंबईच्या 'टोनी'ला ११ खाती विकणारा एजंट जळगावातून गजाआड

मुळचा राजस्थानचा करण सांखला अटकेत; खात्यामागे ४० हजार रुपये उकळल्याची काळी कमाई उघड, सायबर पोलिसांची धडक कारवाई
Cyber Crime
Cyber CrimePudhari
Published on
Updated on

जळगाव : टूर अँड ट्रॅव्हल्स व्यवसायाचा आभासी बुरखा पांघरून सायबर गुन्हेगारांचे कोट्यवधींचे काळे धन पचवणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा जळगाव सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. लोकांची बँक खाती भाड्याने घेऊन तब्बल २ कोटी १५ लाख ३९ हजार २३० रुपयांचा सायबर दरोडा टाकणाऱ्या करण भारत साखला उर्फ सैनी (वय ३१, रा. रायसोनी नगर, जळगाव, मूळ रा. मेर्ता सिटी, जि. नागौर, राजस्थान) या भामट्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ९ जुलै २०२४ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत हा हादरवणारा प्रकार घडला आहे.

Cyber Crime
Satara Cyber Crime: सायबर चोरट्यांना ‘डाटा’ विकणारे गजाआड

असा उघडकीस आला प्रकार

सायबर भामट्यांनी ऑनलाईन फसवणूक करून लुटलेली रक्कम वेगळ्या बँक खात्यांमध्ये वर्ग केली होती. ही संशयास्पद रक्कम खात्यावर येताच पोलिसांनी संबंधित खाती 'होल्ड' (गोठवली) केली. जळगावातील दोन नागरिकांची खाती अचानक गोठवली गेल्याने त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी त्यांच्याकडे पोलिसी खाक्या दाखवताच, 'टूर अँड ट्रॅव्हल्स व्यवसायाच्या व्यवहारासाठी करण सांखला याने ही खाती वापरण्यास मागितली होती,' असा खळबळजनक खुलासा या दोघांनी केला.

Cyber Crime
Pune Cyber Crime Police: सायबर गुन्हेगारांवर पुणे पोलिसांचा डिजिटल वॉच; ‘प्रगती’ प्रणालीमुळे तपासाला वेग

खात्यामागे ४० हजारांचे कमिशन

तात्काळ सूत्रे हलवत सायबर पोलिसांनी करण सांखला याला ताब्यात घेऊन खाक्या दाखवताच आंतरराज्यीय रॅकेटचे धागेधोरे समोर आले. सांखला हा या आंतरराज्यीय टोळीचा मुख्य 'एजंट' म्हणून काम करत होता. तो जळगावातील निष्पाप नागरिकांची बँक खाती मिळवून ती मुंबईतील 'टोनी' नावाच्या म्होरक्याला पुरवायचा. एका खात्याच्या मोबदल्यात सांखला तब्बल ४० हजार रुपये कमिशन लाटत होता. तपासात त्याने आतापर्यंत महाराष्ट्रासह विविध राज्यांतील ११ बँक खाती या 'टोनी'ला पुरवल्याचे उघड झाले आहे.

Cyber Crime
Cyber Crime: ७.४२ कोटींच्या फसवणुकीच्या देशभरातून ४२ तक्रारी दाखल; सायबर फसवणुकीसाठी बँक खाती देणारे रॅकेट उघड

मुंबईच्या 'टोनी'चा शोध पोलीस घेत आहेत

याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्याचे कर्मचारी प्रमोद वाडीले यांच्या फिर्यादीवरून करण सांखलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चक्राकार वेगाने सुरू आहे. या रॅकेटचे मुख्य मूळ असलेल्या मुंबईच्या 'टोनी'चा शोध आता पोलीस घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news