Cyber Crime: ७.४२ कोटींच्या फसवणुकीच्या देशभरातून ४२ तक्रारी दाखल; सायबर फसवणुकीसाठी बँक खाती देणारे रॅकेट उघड

खार पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासात हे रॅकेट उघडकीस आले.
Cyber Crime
Cyber CrimePudhari
Published on
Updated on

मुंबई: सायबर गुन्हेगारांना फसवणुकीसाठी बँक खाती उपलब्ध करून देणाऱ्या ‘म्यूल अकाउंट’ रॅकेटचा खार पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणात अविनाश खरात आणि विकास भुजबळ या दोघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्या नावावर असलेल्या २२ बँक खात्यांचा सायबर फसवणुकीसाठी वापर झाल्याचे तपासात समोर आले आहे.

खार पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासात हे रॅकेट उघडकीस आले. एका महिलेला टेलिग्रामच्या माध्यमातून संपर्क साधत, या दोघांनी ऑनलाइन टास्क पूर्ण केल्यास मोठा नफा मिळेल, असे आमिष दाखवले. त्यानंतर विविध बँक खात्यांमध्ये ४ लाख ७ हजार ७६४ रुपये जमा करण्यास भाग महिलेला भाग पाडले.

Cyber Crime
Mankhurd Subway Waterlogging: मानखुर्द सबवेचा पावसाळी त्रास कायमचा संपणार; १४.८६ कोटींच्या जलवाहिनी प्रकल्पाला मंजुरी

पैसे जमा केल्यानंतर मात्र कोणताही परतावा देण्यात न आल्याने आपली फसवणूक झाल्याचे समजल्यावर तिने पोलिस ठाण्यात तक्रार केली. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणासोबत सायबर हेल्पलाइन १९३० आणि सायबर समन्वय पोर्टलवरील माहितीचा आधार घेतला. तपासात अविनाश खरात आणि विकास भुजबळ यांचा सहभाग निष्पन्न झाला.

२२ खात्यांचा सायबर फसवणुकीसाठी वापर

पोलिस तपासात अविनाश खरातच्या नावावर १३, तर विकास भुजबळच्या नावावर ९, अशी एकूण २२ बँक खाती आढळून आली. या २२ खात्यांची सखोल माहिती सायबर समन्वय पोर्टलवर तपासली असता, देशभरातील ४२ सायबर फसवणुकीच्या तक्रारींमध्ये या खात्यांचा संबंध असल्याचे उघड झाले. या तक्रारींमध्ये झालेल्या फसवणुकीची एकूण रक्कम ७ कोटी ४२ लाख २८ हजार ४०९ रुपये असल्याचे निष्पन्न झाले.

Cyber Crime
Mumbai News: ‘तारक मेहता’च्या स्वप्नासाठी घर सोडले आणि गाठली मायानगरी; मुलगा सुखरूप सापडल्याने कुटुंबीयांचा जीव भांड्यात

रकमेचा प्रवाह तपासणार

म्यूल अकाउंट म्हणजे सायबर गुन्हेगारांकडून फसवणुकीची रक्कम स्वीकारण्यासाठी आणि पुढे वळवण्यासाठी वापरले जाणारे दुसऱ्या व्यक्तीच्या नावावरील बँक खाते. अशा खात्यांमुळे फसवणुकीच्या पैशांचा मूळ स्रोत शोधणे पोलिसांसाठी आव्हान आहे.

फसवणुकीची रक्कम नेमकी कोणत्या खात्यांमध्ये वळवण्यात आली, या खात्यांचा वापर करणारे सायबर गुन्हेगार कोण आहेत आणि आरोपींना या व्यवहारांच्या बदल्यात आर्थिक मोबदला मिळत होता का, याशिवाय या रॅकेटशी संबंधित इतर आरोपी, लाभार्थी आणि आर्थिक व्यवहारांची साखळी शोधण्याचे काम खार पोलिसांकडून सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news