Jalgaon crime : बालविवाह अन् लैंगिक अत्याचार; पाचोऱ्यात नवऱ्यासह पालक अन् सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल

5 आरोपींवर पोक्सोसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल
Child Abuse Case
Child Abuse CasePudhari
Published on
Updated on

जळगाव : पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे पूर्णपणे माहीत असतानाही तिचे बळजबरीने लग्न लावून दिले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करणारा नराधम पती, बाललैंगिक अत्याचाराला खतपाणी घालणाऱ्या आई-वडील आणि सासू-सासऱ्यांविरुद्ध पाचोरा पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि.६) सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणातील पीडितेचे वय १७ वर्षे १ महिना ९ दिवस इतके आहे. तिने दिलेल्या जबाबावरून पाचोरा पोलिसांत भादंवि/भारतीय न्याय संहिता व पोक्सो कायद्यांतर्गत पोक्सोसह बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Child Abuse Case
Jalgaon Crime : जळगाव जिल्ह्यातील ५० सराईत गुन्हेगार हद्दपार

मिळालेल्या माहितीनुसार, ४ ऑगस्ट २०२५ ते २० जुलै २०२६ या कालावधीत कुर्बान नगर (पाचोरा, जि. जळगाव) आणि मोहेरी मोगलाई (ता. व जि. धुळे) येथे हा प्रकार घडला. पीडिता ही अल्पवयीन आहे हे ठाऊक असतानाही तिच्या आई-वडील आणि सासू-सासरे यांनी संगनमत करून तिचा विवाह आरोपी शोएब अय्युब टकारी याच्याशी लावून दिला. विवाहानंतर आरोपी शोएब याने पीडितेशी वेळोवेळी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. या बाललैंगिक अत्याचारातून पीडिता गर्भवती राहिली व तिने एका बाळाला जन्म दिला.

Child Abuse Case
Jalgaon crime : चोपड्याच्या पाटचारीवर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राइक; गांजाच्या तस्करांना दणका, ६ लाखांच्या मुद्देमालासह तिघे गजाआड

अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून देऊन तिच्यावर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराला व शोषणाला प्रोत्साहन दिल्याप्रकरणी आरोपींची शोएब अय्युब टकारी (पती), अय्युब टकारी (सासरे), आशा अय्युब टकारी (सासू, तिघे रा. कुर्बान नगर, पाचोरा), तसेच पिडितेच्या आई वडीलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन पिडीत मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून गुं र न ३६७/२०२६ कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Child Abuse Case
Jalgaon Crime : विवाहबाह्य प्रेमसंबंध, खोट्या तक्रारीची धमकी; तरुणाने उचलले टोकाचं पाऊल, चौघांविरुद्ध गुन्हा

भारतीय न्याय संहिता कलम ६४(२)(आय), ६४(२)(एम), ३(५), लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायदा (पोक्सो) २०१२ चे कलम ४, ६, १७ तसेच बालविवाह प्रतिबंधक अधिनियम चे कलम ९, ११. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप आरोपीला अटक झालेली नसून पुढील तपास अंमलदार पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायाळ (पाचोरा पोलीस ठाणे) हे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news