Jalgaon Crime : जळगाव जिल्ह्यातील ५० सराईत गुन्हेगार हद्दपार

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बडगा
तडीपार
तडीपारPudhari File Photo
Published on
Updated on

जळगाव : आगामी सण-उत्सव शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडावेत, यासाठी जळगाव जिल्हा पोलीस दलाने सराईत गुन्हेगारांविरुद्ध कठोर पावले उचलली आहेत. जिल्ह्यात गंभीर गुन्हे करून दहशत निर्माण करणाऱ्या ५० सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये ७ गुन्हेगारी टोळ्यांतील १५ सक्रिय सदस्यांचा आणि ३५ वैयक्तिक गुन्हेगारांचा समावेश आहे.

​हद्दपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांची यादी

​महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५५ अन्वये हद्दपार टोळी सदस्य (१५)

  • आकाश उर्फ खंड्या सुकलाल ठाकूर (तुकारामवाडी, जळगाव - एम.आय.डी.सी. पो.स्टे.)

  • ​पवन उर्फ बद्या दिलीप बाविस्कर (तुकारामवाडी, जळगाव - एम.आय.डी.सी. पो.स्टे.)

  • ​आकाश उर्फ आक्या भाऊ रवींद्र मराठे (तुकारामवाडी, जळगाव - एम.आय.डी.सी. पो.स्टे.)

  • ​आकाश अरुण दाहेकर (जाखणीनगर, कंजरवाडा, जळगाव - एम.आय.डी.सी. पो.स्टे.)

  • ​टारझन उर्फ बल्लू अरुण दहेकर (जाखणीनगर, कंजरवाडा, जळगाव - एम.आय.डी.सी. पो.स्टे.)

  • ​अमन उर्फ खेकडा रशीद सय्यद (सुप्रीम कॉलनी, जळगाव - एम.आय.डी.सी. पो.स्टे.)

  • ​रवी प्रकाश चव्हाण (नाथ गल्ली, तांबापुरा, जळगाव - एम.आय.डी.सी. पो.स्टे.)

  • ​गुरुदयालसिंग मंजिसिंग टाक (नाथ गल्ली, तांबापुरा, जळगाव - एम.आय.डी.सी. पो.स्टे.)

  • ​गिरीष किशोर घुगे (वंजारी) (खंडेरावनगर, जळगाव - एम.आय.डी.सी. पो.स्टे.)

  • ​करण उर्फ विजय ज्ञानेश्वर केदार (गांधीपुरा, एरंडोल - एरंडोल पो.स्टे.)

  • ​समीर उर्फ सनी आनंदा संदानशिव (गांधीपुरा, एरंडोल - एरंडोल पो.स्टे.)

  • ​वसीम शहा रहेमान शहा (मोमीन मोहल्ला, नशिराबाद - नशिराबाद पो.स्टे.)

  • ​सादीक शहा हाफिजउल्ला शहा (मोमीन मोहल्ला, नशिराबाद - नशिराबाद पो.स्टे.)

  • ​अक्षय उर्फ बाव्या वंशीलाल धोबी (रथ चौक, वारीवाडा, पिंप्राळा, जळगाव - रामानंदनगर पो.स्टे.)

  • ​सागर उर्फ भोला अरुण भोई (भोईवाडा, पिंप्राळा, जळगाव - रामानंदनगर पो.स्टे.)

विविध विभागांनुसार हद्दपार वैयक्तिक गुन्हेगार (३५)

​​जळगाव शहर विभाग: भूषण मनोज अहिरे (भवानी माता मंदिराजवळ), तेजस दिलीप सोनवणे (पार्वताबाई नगर, कांचननगर), राकेश भीमराव सपकाळे (नागसेननगर, रामेश्वर कॉलनी).

नशिराबाद: फिरोज शहानुर शहा (मोमीन मोहल्ला).

​भुसावळ विभाग: चेतन उर्फ गुल्या पोपट खडसे (भुसावळ), संदीप बुधा खंडारे (दीनदयाळ नगर), नशिरशहा जनाबशहा फकीर (निभोरा), जितू अलियास जान उर्फ जितू ज्योती जान - तृतीयपंथी (समतानगर), योगेश देविदास तायडे (मोहन नगर), शेख मुस्ताक शेख अन्वर (मुस्लीम कॉलनी), सिकंदर अली बशरत अली सैयद (हद्दीवाली चाळ), सम्राट कुमार सुरेश बनसोडे (स्नेहल कॉलनी), शाकीर उर्फ गोलू शेख रशीद (३२ खोल्या), गणेश बळीराम कोळी (जावाई नगर, धरणगाव).

पाचोरा विभाग: विक्रम उर्फ बुट्या विनोद अहिरे (वाहेरपुरा), मुख्तार उर्फ धडा मेहबूब शेख (कुर्बान नगर), किरण साहेबराव शिंपी (जनता वसाहत), भगवान लक्ष्मण पाटील (सार्वेपिंप्री), सचिन बापुराव पाटील (सार्वेपिंप्री), जावेद उर्फ जबीर बल्लू पिंजारी (कुर्बान नगर), सलमान शेरू पिंजारी (कुर्बान नगर), प्रकाश दुधा राठोड (हनुमानवाडी, गाळण), विजय देविदास मांडोळे (गाडगेबाबा नगर), ज्ञानेश्वर उर्फ सोनू समाधान गायकवाड (आंबेवगाव).

चाळीसगाव विभाग: प्रवीण पुरुषोत्तम धनगर उर्फ आण्णा (वाघळी), सुशील विलास निकाळजे (नेताजी चौक), ऋषिकेश उर्फ मायकल दीपक पाटील (श्रीकृष्ण कॉलनी, करगाव रोड), पवन दीपक पाटील (भऊर).

भडगाव विभाग: प्रवीण उर्फ भावड्डू सुभाष नाथ (खालची पेठ), योगेश कैलास पाटील (वॉक), सागर रवींद्र ह्यालोज (पिंपरखेड).

​जामनेर विभाग: सुनील पांडुरंग पारधी (फतेहपूर), विजय पांडुरंग पारधी (फतेहपूर).

चोपडा व धरणगाव: भैया उर्फ विजय लोटन पाटील (बोरोले नगर, चोपडा), सोनू उर्फ स्वप्निल पांडुरंग धनगर (धरणगाव)

​नागरिकांना पोलिसांचे आवाहन

हद्दपार केलेल्या व्यक्तींचा जिल्ह्याच्या हद्दीत वावर आढळल्यास नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाईल आणि संबंधित गुन्हेगारावर अटकेची कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news