जळगाव : महाड येथे 2 लाख 24 हजारांची घरफोडी

घरफोडी
घरफोडी
Published on
Updated on

जळगाव : पुढारी वृत्तसेवा ; चाळीसगाव तालुक्यातील महाड येथे घराचे कुलूप तोडून दोन लाख 24 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम घेऊन अज्ञात चोटे पसार झाले. याप्रकरणी मेहुनबारे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील बहार येथे राहणारे कल्पेश संजय सूर्यवंशी (दि. 16) बाहेर गेले असता भर दिवसा अज्ञात चोरट्यांनी घराला लावलेले कुलूप तोडून बेडरूम मधील कपाटातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने असे एकूण दोन लाख चोवीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला.  जाताना चावी पुन्हा त्याच जागी लावून पसार झाले. याप्रकरणी कल्पेश सूर्यवंशी यांनी दिलेल्या तक्रारीवरून मेहुनबारे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रोहिदास माळी हे करीत आहे.

हेही वाचा ;

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news